"त्या' मुलीच्या हत्येचा खटला "फास्ट ट्रॅक' कोर्टात चालविणार : दिलीप कांबळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

जळगाव : समतानगरातील अल्पवयीन मुलीची हत्या प्रकरणाचा खटला "फास्ट ट्रॅक' कोर्टात चालविण्यात येईल. आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी शासनाचा प्रयत्न राहील, अशी घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांनी केली. आज त्यांनी आज समतानगरात जाऊन पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. 

सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे आज जळगाव दौऱ्यावर होते. समतानगरात जाऊन त्यांनी हत्या झालेल्या मुलीच्या आई-वडीलांची भेट घेतली. आमदार सुरेश भोळे त्यांच्यासमवेत होते. यावेळी श्री. कांबळे म्हणाले, की या घटनेतील संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे, परंतु त्याचे आणखी काही साथीदार असतील तर त्यांचाही तपास करून त्यांना अटक करण्यात येईल. या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन प्रयत्नशील असेल. हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल. तसेच या प्रकरणी ऍड. उज्ज्वल निकम किंवा आणखी कोणी सरकारी वकील नियुक्त करण्यासंदर्भात शासन लवकरच निर्णय घेईल. आरोपींवर ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यातून मुलींच्या आई-वडिलांना शासनातर्फे मदत देण्यात येईल. तसेच तिच्या वडिलांची शिक्षा कमी करण्याबाबत आपण राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. यावेळी अरुण चांगरे, अनिल अडकमोल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon girl murder dilip kamble