गीतांजली एक्‍स्प्रेसच्या जनरेटर बोगीला आग 

live photo
live photo

जळगाव ः मुंबईहून नागपूरकडे जाणाऱ्या गीतांजली एक्‍स्प्रेसच्या मागच्या बाजूने असलेल्या जनरेटर बोगीला अचानक आग लागल्याची घटना घडली. सदरचा प्रकार दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास शिरसोली जवळ घडली असून, यात प्रवाशांना दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. 
मुंबईकडून नागपूरला जाणारी गीतांजली सुपरफास्ट एक्‍स्प्रेस जळगावकडे येत असताना शिरसोली स्टेशनपासून काही अंतरावर जनरेटर बोगीला अचानक आग लागून धूर निघू लागला होता. दुपारी बारा ते साडेबाराच्या सुमारास जळगावपासून वीस- पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरसोली स्टेशनच्या पुढे घडली. अचानक आग लागल्याचे प्रवाशांना समजल्यानंतर घबराट होवून धावपळ सुरू झाली होती. मात्र गीतांजली एक्‍स्प्रेस शिरसोली स्टेशनवर थांबविण्यात आली होती. जनरेटरमधील आग विझवून त्यातील बिघाड दुरूस्त करण्यात आला. मात्र आग लागलेली बोगी रेल्वेपासून वेगळी करून गाडीला पुढे मार्गस्थ करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली होती. शिवाय शिरसोली रेल्वे स्टेशनवर देखील गर्दी झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com