ग्रामपंचायत सदस्याने स्वत: साफ केली गटार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 जून 2018

चुंचाळे (ता.यावल)  : येथील बसस्थानक जवळील मुख्य चौकातील गटार काही दिवसापासून कचरा साचल्याने रस्त्यावरून वाहत होती. यामुळे वाहन धारकांमध्ये वाद देखील उद्धभवत होते. सफाई कामगार एकच असल्याने गावातील गटारी तुंबल्या आहे. या अनुषंगाने आपले कर्तव्य पार पाडत प्रभाग क्र 1 मधील ग्रामपंचायत सदस्य सुकलाल राजपुत व सरपंचपती यांचे मोठे भाऊ रविंद्र पाटील यांनी आज (ता. 24) स्वत:च गटार काढल्याने सोशल मिडीयावर त्यांचे कौतुक होत आहे. 

याबाबत सविस्तर असे की वार्ड क्रमांक 1 व 2 मधील मुख्य गटार गेल्या आठ दिवसापासून तुंडूब भरली होती. वेळोवेळी ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला तोंडी कळविले होते. या तोंडी तक्रारीचे निवारण करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य सुकलाल राजपुत यांनी स्वत: हातात फावडा घेत गटार साफ केली. त्याच्यासोबत रविंद्र पाटील, संजय तडवी, रहीमान तडवी, संजय पाटील हे होते. याबाबत त्यांना विचारले असता ग्रामस्थांनी आपल्याला मतदानाचे दान देवून आपल्याला निवडून दिले आहे. आपल्याकडूनही काही कामाच्या अपेक्षा आहे म्हणूनच आज स्वत: गटार काढली असे सुकलाल राजपुत यांनी सकाळ ला सांगितले.

Web Title: marathi news jalgaon grampanchayat member