ग्रामपरिवर्तनासाठी सरसावली "ग्रीन आर्मी' 

live photo
live photo

जळगाव : ग्रामपरिवर्तनात लोकसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. जळगावातील सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून सद्‌गुरू भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासणारे विधायक, सामाजिक, धार्मिक उपक्रम जिल्ह्यात सर्वत्र राबविण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून "ग्रीन आर्मी' स्थापन करत एकलग्न येथे ग्रामपरिवर्तनाचा संकल्प करण्यात आला आहे. 
एकलग्न (ता. एरंडोल) येथे पर्यावरण समृद्धी, तसेच ग्रामपरिवर्तनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून उपक्रमांचा निश्‍चित स्वरूपात आराखडा करण्यात आला असून, आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा, जलसंधारण आदींच्या माध्यमातून एकलग्न येथे ग्रामपरिवर्तनाचा मंडळाचा मानस आहे. गावात मुख्य रस्त्यालगत वृक्षारोपण करण्यात आले असून या माध्यमातून परिसर हिरवळीने नटला आहे. वृक्षारोपणाबाबत उपवनसंरक्षक दि. वा. पगार, मोहन बुवा, कैलास सावदेकर, अडकमोल आदी मान्यवरांचे सहकार्य लाभत आहे. 

सार्वजनिक मंडळांचा सहभाग 
एकलग्न येथील सार्वजनिक मंडळाचा या उपक्रमात संपूर्ण सहभाग, सहकार्य लाभत असून, यामध्ये गणेश मंडळ, नवतरुण दुर्गा देवी मंडळ, जय बजरंग मित्रमंडळ, शिवशक्ती मित्रमंडळ यांच्या प्रयत्नांतून गावातील युवाशक्तीचे संघटन करण्यात येत असून, या युवाशक्तीच्या एकत्रित प्रयत्नांतून विकासकार्यात हातभार लाभणार आहे. गावातील प्रकल्प समन्वयक प्रताप पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह देवेंद्र गोसावी, किरण पाटील, हेमंत पाटील, भरत पाटील, घनश्‍याम चौधरी, चंद्रशेखर शिंदे, ज्ञानेश्वर पाटील, योगेश पाटील, राहुल पाटील, उदय पाटील, चेतन पाटील, मयूर पाटील, किशोर जाधव, प्रदीप पवार, राजू भिल, लखन लोणवार, जगदीश वारुळे आदींचे सहकार्य लाभत आहे. 

सद्‌गुरू सेवा मंडळाचे प्रयत्न 
जळगाव येथील सद्‌गुरू सेवा मंडळाच्या माध्यमातून सद्गुरू भक्तराज महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने मंडळाचे अध्यक्ष सद्‌गुरू सेवा मंडळाचे अध्यक्ष हेमंत कसरेकर ऊर्फ नंदूदादा (रा. कांदळी) यांच्या प्रेरणेतून सामाजिक बांधीलकी जोपासणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मंडळाचे सचिव जगदीश तळेले, बालविश्व इंग्लिश स्कूलच्या संचालिका भारती चौधरी, संदीप चौधरी, श्‍यामकांत पंडित, जयंत पळशीकर आदींच्या माध्यमातून विधायक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com