सत्ताधाऱ्यांच्या नियोजनाअभावी "जलसंकट' : गुलाबराव देवकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 एप्रिल 2019

जळगाव : महापालिकेवर आणि राज्यातही भाजपची सत्ता आहे; परंतु त्यांचे अपूर्ण नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहिती, यामुळे जळगावकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असून, तीन दिवसांआड पाणीपुरवठ्याची वेळ आली आहे. भाजपला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आपुलकी नाही, त्यामुळे जळगावकरांच्या समस्यांविषयी जिव्हाळा बाळगणारा हक्काचा माणूस म्हणून आपण मला विजयी करावे, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांनी केले. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीतर्फे आज (ता. 11) शहरातील कांचननगर, वाल्मीक नगर, जैनाबाद, दाळफड, लिधुरवाडा, चौघुले प्लॉट या भागात श्री. देवकर यांनी प्रचारफेरी काढली. 
यावेळी श्री. देवकर म्हणाले, की जळगावची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी तीस कोटींचे भव्य छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहाची निर्मिती केली. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकाचे काम मार्गी लावले. 2012 मध्ये शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणात केवळ 11 टक्के पाणीसाठा असताना वाघूर धरणावर "डाऊनस्कीम' राबवून जळगावकरांची तहान भागविली. पण आज महापालिकेवर सत्ता मिळविणाऱ्यांचे अपुरे नियोजन आणि व्यवस्थेविषयी अर्धवट माहितीच्या आधारे "सुलतानी' कारभार सुरू असून, त्यांनी जळगावकरांवर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आणली आहे. 
या प्रचारफेरीत जिल्हाध्यक्ष ऍड. रवींद्र पाटील, निरीक्षक करण खलाटे, कॉंग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्‍याम चौधरी, माजी उपमहापौर गणेश सोनवणे, माजी नगराध्यक्ष चत्रभूज सोनवणे, महानगर जिल्हाध्यक्ष नामदेव चौधरी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, उज्ज्वल पाटील, बंडू भोळे, सागर सपके, अनिरुद्ध जाधव, रोहन सोनवणे, मंगला पाटील, कल्पना पाटील, नीला चौधरी, मीनल पाटील, प्रतिभा शिरसाट यांच्यासह राष्ट्रवादी आघाडीचे पदाधिकारी, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. 
दरम्यान, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज (ता. 11) पक्ष कार्यालयात प्रतिमापूजन व माल्यार्पण करून गुलाबराव देवकर यांनी वंदन केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon gulabrao devkar jalsankat