माजी नगरसेवकावर जळगावात गोळीबार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 31 डिसेंबर 2018

जळगाव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक तथा विद्यमान भाजप नगरसेविका उषा पाटील यांचे पती संतोष पाटलांवर आज जळगावात सकाळी पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाला. यात संतोष पाटील गंभीर जखमी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 
जळगाव शहरालगत सावखेडा शिवारात आर्यन पार्कजवळ ही घटना घडली. घटनेनंतर त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्याठिकाणी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सहयोग क्रिटीकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असून या घटनेमुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.

Web Title: marathi news jalgaon gun fiyer maji nagarsevak santosh patil