जळगाव जलमय... हरिविठ्ठल नाल्यात दोघेजण वाहिले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

जळगाव ः शहरासह जिल्ह्यात रविवारी झालेल्या संततधार पावसानंतर आज सकाळी पावसाने उघडीप घेतली होती. परंतू, दुपारी दोनच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटांत पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे शहरातील अनेक मार्ग पावसामुळे काही वेळ बंद होते. शिवाय, मोठ्या नाल्यांना पहिल्यांदाच पुर आले असून, पिंप्राळ्यात दोन जण वाहून गेले आहेत. 

दुपारी झालेल्या धुव्वाधार पावसाने श्रीधरनगर, हरिविठ्ठलनगर, खंडेरावनगर, पिंप्राळा परिसरातील नाल्यास पूर आला. यात शामनगर परिसरातील एक दुचाकीस्वार वाहून गेला. त्यासोबत एक महिलाही होती. नाल्याला पूर असल्याचे त्यांचे मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडले नाहीत. तलाठी संदीप ढोभाळसह महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण विभागाचे कर्मचारी मृतदेहाचा शोध घेत होते. तसेच तीन म्हशीही वाहून जात होत्या. त्यातील एका म्हशीला वाचविण्यात यश आले. दोन म्हशी वाहून गेल्या आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon heavy rain