प्रवाहात वाहून जाणारा विद्यार्थी बचावला 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

जळगाव : आज दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास शहरात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आलेल्या गटारात वाहून जाताना विद्यार्थी बालंबाल बचावला. सहलीहून परतल्यानंतर शाळेतून घरी जाताना ही घटना घडली. थोड्या अंतरापर्यंत वाहत गेल्यानंतर काही तरुणांनी या तिसरीतील मुलाला वाचविले. 
विवेकानंद प्रतिष्ठान संचलित डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील तिसरीच्या वर्गाची आज हतनूर धरणावर सहल गेली होती. दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास सहलीच्या बस परतल्या. सहलीहून परतलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी पालकांना सुयोग कॉलनीतील शाळेतच बोलाविण्यात आले होते. 

गटाराच्या पुरात गेला वाहून 
याच वेळेस सुमारे तासभर मुसळधार पाऊस पडल्याने शाळा परिसरातील गटारी, नाले भरून वाहू लागले. सहलीला गेलेला तिसरीतील मुलगा आर्यन श्रीराम पाटील याला घेण्यासाठी त्याचे आजोबा आले होते. शाळेतून परतताना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठी गटार आहे. या गटाराला पूर आल्याने ती ओलांडताना आर्यनचा पाय घसरला आणि जोरदार प्रवाहात तो वाहून गेला. गटार भुयारी असल्याने हा विद्यार्थी पुढे जाऊन सेंट जोसेफ शाळेजवळ एका तरुणाला दिसला. त्याने वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला ते जमले नाही. पुढे मीनाताई ठाकरे मार्केटजवळ काही तरुण उभे होते. त्यापैकी नीलेश वानखेडेसह अन्य तरुणांनी या मुलाला गटारातून बाहेर काढत त्याचे पोट व पाठ दाबून पाणी काढले. पिंटू कोल्हे, दत्ता चौधरी, ज्ञानेश्‍वर सपके यांनीही त्यास मदत केली. मुलगा वाहत जात असताना बसचालकांनी धावपळ केली. नंतर या मुलाला उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तरुणांच्या सतर्कतेने त्याचे प्राण वाचले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon heavy rain student water