"आपणच आपल्यासाठी' म्हणत भरले महामार्गावरील खड्डे अन्‌ साईडपट्ट्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जळगाव : शहरातून गेलेल्या महामार्गावर जीवघेणे खड्डे झाले आहेत. खड्ड्यांमुळे अपघात वाढले आहे. याकडे ना महापालिकेचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आता या महामार्गावरून रोज कंपनीत ये-जा करणाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनीच पुढाकार घेतला आहे. सामाजिक बांधिलकी जपत या कर्मचाऱ्यांनी "आपणच आपल्यासाठी' असे म्हणून महामार्गावरील मोठे खड्डे तसेच साइडपट्टी बुजण्याचे आज काम केले. 

शहरातून गेलेल्या महामार्गावर गिरणा नदीवरील पूल ते आकाशवाणी चौकापर्यंत खड्डेच खड्डे झाले आहेत. या खड्ड्यांमुळे रोज लहान- मोठे अपघात होत आहेत. यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी देखील प्रशासनाकडून खड्डे बुजण्याचे काम करण्यात आलेले नाही. यामुळे शहरातील नागरिकच पुढाकार घेत असून, खड्डे बुजण्याचे काम करत आहेत. 

"सुप्रिम'मध्ये जाणारे एकवटले 
सुप्रिम कंपनीत काम करणाऱ्या दहा ते बारा कर्मचाऱ्यांनी रोजच्या त्रासाला कंटाळून अखेर आज रविवारची सुटी साधत खड्डे बुजविले. सुप्रिममधील हे कर्मचारी दर रविवारी क्रिकेट खेळण्यासाठी जात असतात. या क्रिकेट टीमने आज खेळायला न जाता महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा निर्णय घेतला. चौकामधील साईडपट्या आणि रस्त्यावरील मोठे खड्डे बुजविले. यात आकाशवाणी चौक, एकलव्य ग्राउंडजवळील महामार्गावरील मोठा खड्डा, शिवकॉलनी रेल्वे पुलावरील खड्डे व गुजराल पेट्रोलपंप चौक येथील खड्डे बुजविले. 

...यांचा होता सहभाग 
खड्डे बुजविण्याच्या मोहिमेत धीरज चौधरी, सुनील लोहार, सुनील शिरसाळे, हिरालाल माळी, साहेबराव कोळी, संतोष कडगर, अनुप मंडल, राजू पाटील, प्रशांत बियाणी, प्रेरित बेंडाळे, दीपक बऱ्हाणपूरकर, मनोज मोदी, मितेश पारेख, जगदीश राठोड, योगेश राठोड यांनी श्रमदान केले. बहुतांशी सुप्रिम कंपनीतील कर्मचारी आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway road youth pach