घुसखोरी थांबविण्यासाठी हिंदू राष्ट्र महत्वाचे : ईश्वरप्रसाद खंडेलवाल 

ishawarlal khandelwal
ishawarlal khandelwal

जळगाव : देशातील हिंदू समाज हा एका शूरवीर योद्धांचा समाज आहे. मुघल, इंग्रज हे योद्धांना हरवू शकले नाही आतापर्यंत हिंदूंनी कोणत्याच राज्यावर आक्रमण केलेले नाही. देशात घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घुसखोरी थांबविण्यासाठी हिंदू राष्ट्राची निर्मिती होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी देशभरातील हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन लष्कर-ए-हिंदचे संस्थापक अध्यक्ष ईश्‍वरप्रसाद खंडेलवाल यांनी केले. 

शहरातील शिवतीर्थ मैदानावर आज ता. 1 रोजी सायंकाळी 6 वाजता हिंदू जनजागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. यासभेला प्रमुख वक्ते म्हणून लष्कर-ए-हिंदचे संस्थापक अध्यक्ष ईश्वरप्रसाद खंडेलवाल, हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सनातनचे धर्मप्रसारक नंदकुमार जाधव, हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.विरेंद्र इचलकरंजीकर आदी आदी उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री. खंडेलवाल म्हणले की, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामांच्या रामराज्यात कोणावरही अन्याय झाला नाही त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्वधर्मसमभाव होता. केवळ हिंदु संस्कृतीचे रक्षण करणे, हे संकुचित ध्येय न ठेवता कृण्वतो विश्‍वम आर्यम म्हणजेच अखिल विश्‍व सुसंस्कृत करू, अशी आपल्या पूर्वजांची घोषणा होती आणि ती सार्थ करुन प्रत्येकाने धर्मकर्तव्य पार पाडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. सभेला नागरिक मोठ्या ंसंख्येने उपस्थित होते. तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

2023 पर्यंत हिंदू राष्ट्राचा संकल्प 
सेक्‍युलरवादींनी हिंदू राष्ट्राविषयी इतर धर्मीयांमध्ये भिती निर्माण केली आहे. मात्र न्याय, समता व बंधुता यांची शिकवण देणारे हिंदू राष्ट्र 2023 पर्यंत निर्माण करण्याचा संकल्प या सभेत करण्यात आला. 

धर्मरक्षणासाठी छत्रपतींचा आदर्श घ्यावा 
ज्याप्रमाणे धनुर्धारी अर्जुनाचा प्रत्येक बाण लक्ष्यवेध करायचा; कारण तो सतत श्रीकृष्णाचा जप करायचा. नामजपामुळेच धर्मरक्षराच्या कार्यासाठी आत्मबळ मिळत असल्याने प्रत्येकाने नामजप करणे आवश्‍यक आहे. गोमाता, मंदिरे आणि धर्मशास्त्र यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवरायांचा आदर्श घ्या असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव यांनी केले. 

हिंदूत्वनिष्ठावानांच्या पाठीशी उभे रहा- ऍड. इचलकरंजीकर 
अनेकांकडून देशात कायद्याचा गैरवापर केला जात आहे. हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कायद्याची योग्य माहिती व त्याचा वापर होणे आवश्‍यक असून विधीज्ञांनी हिंदूत्ववादी निष्ठावानांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन हिंदू विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड.विरेंद्र इचलकरंजीकर यांनी केले. 

सेक्‍युलरच्या नावाखाली हुकूमशाही 
भारताला आर्थीक दृष्ट्या दुर्बल करण्याचे षडयंत्र सेक्‍युलवाद्यांकडून सुरु झाले आहे. यातूनच भारताच्या अर्थव्यवस्थेला धोका निर्माण होवू शकतो यामध्ये सेक्‍युलरच्या नावाखाली त्यांच्याकडून हूकूशाही सुरु झाली असल्याचे मत रमे हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले. 

स्व:रक्षणाच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण 
महिलांवर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांनी आपले स्वरक्षण कसे करावे. यासाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षणाची प्रात्यक्षिके सादर करून दाखवली. महिला, महाविद्यालयीन तरुणीचे छेड काढणाऱ्यांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?, गुंडांपासून स्वतःचे रक्षण कसे करावे?, हल्ला झाल्यास त्याला कसे परतवावे याबाबतचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com