एड्‌सग्रस्तांना निवाऱ्याची गरज 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

जळगाव : आजच्या या बदलत्या काळात प्रत्येकाची जीवनशैली बदलत आहे. आरोग्याच्या अनेक समस्या समोर येत आहे. यात एचआयव्ही एड्‌स हा आजार सर्वत्र प्रचलित आहे. ज्याप्रमाणे दिव्यांग व्यक्तींना मदतीची गरज असते त्याचप्रमाणे एड्‌सग्रस्तांना देखील मदतीची गरज आहे. आज औषधोपचार जरी उपलब्ध झाले असली तरी एड्‌सग्रस्त्यांना मात्र आपल्या घरात देखील व्यवस्थित ठेवले जात नसल्याचे चित्र समाजात बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील एड्‌सग्रस्तांना निवाऱ्याची गरज असून यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा अशा अपेक्षा एड्‌सग्रस्तांनी व्यक्त केल्या आहे. 

"एड्‌स' शब्द उच्चारायला आणि लिहायला अतिशय सोपा मात्र हा रोग तितकाच भयानक आहे. कुणाला ह्या रोगाची लागण झाली असे साधे माहिती जरी पडले तरीही अंगावर काटे उभे राहतात. एड्‌सबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने, त्याच्यासोबत हस्तांदोलन केल्याने, सोबत जेवण केल्याने हा रोग होतो म्हणून एड्‌सबाधित रुग्णांना वाळीत टाकले जाते. त्यामुळे आजाराला तोंड देण्याच्या मनोधैर्याचे खच्चीकरण होते. मात्र हा रोग संसर्गजन्य नाही. याबाबत डॉक्‍टरांकडून व संस्थांकडून जनजागृती देखील करण्यात येत आहे. एड्‌स विषयी आजपर्यंत झालेली जनजागृतीमुळे एड्‌सच्या रुग्णांची संख्या बऱ्यापैकी आटोक्‍यात आली आहे. यात जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य एड्‌स नियंत्रण संस्था, जाणीव बहुद्देशीय संस्था यांसारख्या संस्थांनी पुढाकार घेतला असून त्या एड्‌सग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. 
 
दीड हजारावरुन तीनशेवर रुग्ण 
साधारणतः दहा ते बारा वर्षापूर्वी जिल्ह्यात एका वर्षात दीडहजार एड्‌सग्रस्त रुग्ण आढळले जात असत. मात्र उपचार पद्धती व वेळेच करण्यात येणारी तपासणी यामुळे आता ही एड्‌सग्रस्तांची वर्षाची संख्या तीनशेवर आली आहे. हा बदल चांगला असून यासाठी नागरिकांमध्ये जागृकता निर्माण झाली आहे. 
 
एड्‌सग्रस्तांची "जाणीव' 
जाणीव बहुेशीय संस्था ही गेल्या अकरा वर्षापासून कार्य करत आहे. या संस्थेतंर्गत साडेतीनशे एड्‌सग्रस्त विद्यार्थ्यांना दत्तक घेतले असून त्यांना धान्य, औषधी, शैक्षणिक साहित्य संस्थेतर्फे पुरविण्यात येत आहे. शासकीय योजनांचा या विद्यार्थ्यांना लाभ होण्यासाठी संस्था कायम कार्यरत आहे. 
 
एड्‌सग्रस्तांसाठी सतत कार्यरत आहे. संस्थेच्या व शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविले जात आहे. मात्र विद्यार्थ्यांना समाजाकडून मदतीचा हात मिळायला हवा. 
- मनीषा बागूल (जाणीव बहुद्देशीय संस्था) 

Web Title: marathi news jalgaon HIV possitive home