ब्लेड मारून हॉकर्स महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

जळगाव ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अतिक्रमण हटाव मोहीमेत जप्त केलेली लोटगाडी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला हॉकर्सला ब्लॅडे स्वःता मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनपा ईमारतीच्या पार्किंगच्या जागेवर ही घटना सकाळी दहा वाजता घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. जप्त केलेली हातगाडी परत न दिल्याने पथकातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. 

जळगाव ः महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे अतिक्रमण हटाव मोहीमेत जप्त केलेली लोटगाडी सोडविण्यासाठी गेलेल्या महिला हॉकर्सला ब्लॅडे स्वःता मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मनपा ईमारतीच्या पार्किंगच्या जागेवर ही घटना सकाळी दहा वाजता घडल्याने एकच गोंधळ उडाला होता. जप्त केलेली हातगाडी परत न दिल्याने पथकातील महिला कर्मचाऱ्यांशी वाद झाल्याने हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. 

मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने केली जात आहे. यानूसार नुतन मराठा महाविद्यालयाजवळ मुख्य रस्त्यावर पराठ्याची गाडी आहे. त्याठिकाणी त्या रस्त्याच्याकडेला व्यवसाय करतात. मनपाच्या अतिक्रमण निमूर्लन विभागाने सोमवारी राबविलेल्या मोहिमेत गायत्री पवार यांच्या हातगाडीवर कारवाई करीत ती जप्त केली. गायत्री पवार यांनी आज (ता.15) मनपात येऊन उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांची भेट घेवून गाडी परत देण्याची विनंती केली. यावेळी उपायुक्तांनी याबाबत आयुक्तांकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पार्किंगच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील महिला कर्मचाऱ्यांशी पवार यांचे शाब्दीक वाद झाल्यानंतर सोबत आणलेल्या ब्लॅड पवार यांनी हातावर मारले. 

कारवाई करतांना होतो दुजाभाव 
तुकाराम वाडीतील गायत्री पवार या विधवा असून नुतन मराठा महाविद्यालजवळ महिला बचत गटाच्या माध्यमातून पराठा विक्रीचा व्यवसाय करून कुटूंबाचे रहाट गाडे चालवित आहे. सोमवारी गायत्री पवार लोडगाडी अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत जप्त केली. परंतू बाजूला लागणारी गाडीवर मनपाचे पथकाने कारवाईन करता एकच गाडी जप्त का केली. कार्यवाही करायची होती तर सर्वांवर कारवाई करणे गरजेचे आहे. परंतू तसे होत नसून कारवाई करतांना दुजाभाव केला जात असल्याचा आरोप पवार यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या अधिक्षकांवर केला. 

ब्लेडने वार करण्याची धमकी 
उपायुक्तांना भेटल्यानंतर पार्कींगच्या आवारात गायत्री पवार यांनी अतिक्रमण विभागाच्या महिला कर्मचाऱ्यांशी लोट गोडी सोडविण्यावरून चर्चा करत असतांना शाब्दीक वाद झाला. यावेळी अतिक्रमण विभागाच्या माया गोयर, रेहानाबी तस्लीम, लक्ष्मी मराठे यांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता गायत्री पवार यांनी हातावर ब्लेड मारून घेत आत्महत्त्या करण्याचा प्रयत्न केला. त्यात पवार यांच्यासह तिघींच्या हाताला ब्लेड लागले. 

शहर पोलिसात तक्रार 
दरम्यान, गायत्री पवार यांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार नोंदविण्यासाठी मनपा अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी पोहचले होते. तर गायत्री पवार यांनी देखील मनपा महिला कर्मचाऱ्यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. 

बळिरामपेठ मध्ये वाद 
मनपा इमारतीमध्ये सकाळीच वाद घडल्यानंतर बळीराम पेठेतील वखारी जवळील अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करतांना अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये कारवाई करतांना वाद झाला. यावेळी हॉकर्सने आयुक्तांना शिवीगाळ केल्याने एक तास गोंधळ झाला. हा वाद शनिपेठ पोलिस स्टेशन पर्यंत गेल्यावर हॉकर्स धारकांना पोलिस निरिक्षक प्रविण वाडीले यांनी तंबी देत सोडून दिले. 
 

Web Title: marathi news jalgaon hokars woman blead