'हॉट सिटी'च्या यादीत 'जळगाव टॉप टेन मध्ये

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

जळगाव ः यंदाच्या उन्हाळ्यात तापमानात सातत्याने होणारी वाढ नागरिकांसाठी डोकेदुखी ठरली आहे. राहण्यात महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तरप्रदेश राज्य आहे. महाराष्ट्रात याची तिव्रता अधिक जाणवत असून तापमानाची नोंद करणाऱ्या "स्कॉयमेट'ने जी देशातील सर्वाधिक तापमान असणाऱ्या टॉप टेन शहरांची यादी केली आहे त्यात जळगावचा समावेश आहे.राज्यातील चंद्रपूर हे पहिल्या स्थानावर तर जळगाव दहाव्या स्थानावर आहे. जळगावचे आजचे तापमान 45 डिग्री सेल्सियस चंद्रपुरचे 47.3 अंश सेल्सियस इतके नोंदविण्यात आले. 

देशातील मध्यप्रदेश, राजस्थानासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट पसरलेली आहे.या दहा शहरांपैकी सहा शहरे ही महाराष्ट्रातील आहेत. तर तीन राजस्थान व एक मध्यप्रदेशमधील आहे. 

टॉप टेन असलेली उष्ण शहर (स्कॉयमेटनुसार) 

शहर राज्य तापमान 
- चंद्रपूर...............महाराष्ट्र 47.3 
- ब्रम्हपूरी.............महाराष्ट्र 46.7 
- खरगोन............मध्य प्रदेश 46.0 
- अकोला...........महाराष्ट्र 45.7 
- श्रीगंगानगर.........राजस्थान 45.5 
- परभणी.............महाराष्ट्र 45.5 
- वर्धा................महाराष्ट्र 45.5 
- चित्तोडगड...........राजस्थान 45.1 
- चुरू.................राजस्थान 45.0 
- जळगाव ...........महाराष्ट्र 45.0 

Web Title: marathi news jalgaon hot city top ten