नाशिक विभागातून जळगाव जिल्हा अव्वल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

जळगाव ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारीत घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर झाला. यंदा जळगाव जिल्ह्याच्या निकालाची टक्‍केवारी वाढली असून, उत्तर महाराष्ट्र अर्थात नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा बारावीचा निकाल 86.61 टक्‍के लागून अव्वल राहिला आहे. 

पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परिक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल आज (ता.28) दुपारी ऑनलाईन जाहीर झाला. या निकाला नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. यामध्ये नाशिक विभागातून जळगाव जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. यात नाशिक विभागातून एकूण 1 लाख 59 हजार 897 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती; यापैकी 1 लाख 35 हजार 550 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नाशिक विभागाच्या निकालाची टक्‍केवारी 84.77 टक्‍के आहे. यात जळगाव जिल्ह्यातील 48 हजार 618 विद्यार्थ्यांपैकी 42 हजार 108 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी नाशिक विभागातून सर्वाधिक 86.61 टक्‍के आहे. या खालोखाल नाशिक (84.16 टक्‍के), नंदुरबार (83.82 टक्‍के) आणि धुळे (83.52 टक्‍के) असा निकाल आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon HSC exam result