पंख नसलेल्या हुसेनाची विधीच्या अवकाशात "झेप' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

जळगाव : जन्मतःच दोन्ही हात नाहीत; पण नियतीपुढे ते झुकले नाहीत. अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्दीने आज यशाला गवसणी घालत आपल्यासारख्या अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. जळगावातील ऍड. हुसेना रंगरेझ यांची विधी शाखेच्या अभ्यासक्रमातील वाटचालही अशीच प्रेरणादायी. 

जळगाव : जन्मतःच दोन्ही हात नाहीत; पण नियतीपुढे ते झुकले नाहीत. अस्तित्व निर्माण करण्याच्या जिद्दीने आज यशाला गवसणी घालत आपल्यासारख्या अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. जळगावातील ऍड. हुसेना रंगरेझ यांची विधी शाखेच्या अभ्यासक्रमातील वाटचालही अशीच प्रेरणादायी. 
ऍड. हुसेना रंगरेझ यांचा थक्क संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे. जन्मतःच दोन्ही हात नाहीत, अशातच घरातील परिस्थिती अत्यंत बिकट. 3 बहिणी, 2 भाऊ अशा वातावरणात हुसेना यांनी जिद्द, चिकाटीच्या जोरावर आपल्या दोन्ही पायांनी परीक्षेचे पेपर देत बी.ए., एलएलबी, एलएलएम, सेट आदी परीक्षेत प्रावीण्य मिळवत विधी अभ्यासक्रमातील विविध टप्प्यांवर यश मिळवले. त्यांच्या या कष्टाला साथ लाभली ती एस.एस. मणियार विधी महाविद्यालयातील सहाय्यक प्रा. डॉ. विजेता सिंग यांची.. गेल्या 10 वर्षांपासून त्या हुसेना यांच्या भक्कम पाठीशी आहेत. डॉ. विजेता यांनी हुसेना यांना केवळ अभ्यासक्रमातील मार्गदर्शक म्हणूनच नव्हे तर त्यांना मानसिक आधार म्हणून पालकत्वही स्वीकारले. 

न्यायाधीश परीक्षेची तयारी 
सद्य:स्थितीत हुसेना या विद्यापीठात विधी विद्याशाखेत सहाय्यक प्राध्यापिका पदावर कार्यरत असून त्यांनी नुकतीच न्यायाधीश होण्यासाठी परीक्षा दिली आहे. या मुख्य परीक्षेतही आपली कामगिरी चमकदार असेल अशी खात्री त्यांना असून या यशानंतर त्या लौकिकार्थाने न्यायाधीशही होतील.. नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने हुसेना यांच्या या प्रेरणादायी वाटचालीस विनम्र प्रणामच करायला हवा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon hussen vidhi