पंतप्रधानांच्या वक्‍तव्याचा डॉक्‍टरांकडून निषेध 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

जळगाव ः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंड येथील दौऱ्यात वैद्यकिय सेवा व व्यवसायाविषयी केलेल्या वक्‍तव्याचा इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) कडून निषेध नोंदविण्यात आला. या निषेधार्थ आज जिल्ह्यातील दीड हजार डॉक्‍टरांनी काळ्या फित लावून निषेध नोंदवत आरोग्य सेवा दिली. 

आयएमए जळगावच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्यांनी काळ्याफित लावून पंतप्रधान मोदी यांच्या वक्‍तव्याचा निषेध नोंदविला. पंतप्रधान मोदी यांनी डॉक्‍टरांच्या मोठमोठ्या परिषदांवर आक्षेप घेतला. जर डॉक्‍टरांनी परिषदांना हजेरी लावली नाही. तर त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडणार कशी? व रूग्णांवर नवीन तंत्रज्ञान वापरून उपचार कसे केले जाणार? अशी भुमिका आयएमएच्यावतीने मांडण्यात आली. तसेच औषधांच्या किंमतींना डॉक्‍टर नव्हे तर शासन जबाबदार आहे. कारण औषधांच्या किंमती शासनच निश्‍चित करत असते. पण आजच्या स्थितीला प्रसिद्धी मिळविण्यासाठी डॉक्‍टरांना बदनाम करण्याची फॅशन सुरू आहे. पण देशातील 80 टक्‍के जनता ही खासगी आरोग्य सेवेचाच लाभ घेत असतात. यामुळे शासनाने डॉक्‍टरांना बदनाम करण्याचे सोडून कोलमडलेली शासकिय आरोग्य व्यवस्था सुधारण्याकडे लक्ष देण्याचे आयएमएच्यावतीने सांगण्यात आले. यात आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. किरण मुठे, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप जोशी, सचिव डॉ. विलास भोळे, माजी उपाध्यक्ष तथा राज्य आयएमएचे सहसचिव डॉ. राजेश पाटील, माजी राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिल पाटील, डॉ. मनिषा दमानी आदी उपस्थित होते. 

Web Title: marathi news jalgaon ima nishedh