जागतिक कॅरम स्पर्धेसाठी आयशा मोहम्मदची निवड 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जळगाव ः साउथ कोरिया येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक कॅरम स्पर्धेसाठी भारतातर्फे जैन इरिगेशनची खेळाडू आयशा मोहम्मद हिची निवड झाली असून, आज दिल्लीकडे रवाना झाली. 

जळगाव ः साउथ कोरिया येथे होणाऱ्या पाचव्या जागतिक कॅरम स्पर्धेसाठी भारतातर्फे जैन इरिगेशनची खेळाडू आयशा मोहम्मद हिची निवड झाली असून, आज दिल्लीकडे रवाना झाली. 
जैन स्पोर्टस ऍकॅडमीचे खेळाडू, प्रशिक्षक, महिला मंडळ यांच्या वतीने कांताई सभागृहात यावेळी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संघपती दलिचंद जैन, आमदार चंद्रकांत सोनवणे, ज्येष्ठ विधिज्ज्ञ ऍड. सुशील अत्रे उपस्थित होते. सुरवातीला जैन स्पोर्टसचे क्रीडा समन्वयक फारुक शेख यांनी आयशाचा क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. आयशा 26 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पाचव्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी साउथ कोरियाला जात असून, त्या ठिकाणी 18 देशांचा समावेश असल्याचे सांगितले. आयशा ही दुसऱ्यांदा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारी एकमेव खेळाडू असून, यापूर्वी महाराष्ट्रातील संगीता चांदोरकर व अनुपमा केदार यांची निवड झाली होती. 
आमदार सोनवणे यांनी शासनाच्यावतीने आयशाची दखल घेण्याचे व खेळाडूंसाठी संघर्ष करण्याचे आश्‍वासन देऊन आयशाला स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. संघपती दलिचंद जैन यांनी क्रीडा साहित्य देऊन तिचा सत्कार केला. 
त्यानंतर उपस्थित महिला मंडळातर्फे राजी नायर, सरिता खाचणे, कमलेश शर्मा, विजया पांडे यांनी तर महिला हॉकीतर्फे डॉ. अनिता कोल्हे, माधुरी भारुडे, निशा कोंडालकर, ममता बऱ्हाटे, गायत्री साळंके, कीर्ती पाटील, फुटबॉलतर्फे आशुतोष शुक्‍ल, किशोर मराठे, गौरव ठाकूर, प्रशिक्षक अरविंद देशपांडे, अब्दुल मोहसीन, लियाकत अली, अजित घारगे आदींनी सत्कार केला. स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणारच, असा विश्‍वास यावेळी आयशा हिने व्यक्त केला.

Web Title: marathi news jalgaon international carom compitetion aaysha