"आयपीएल'च्या धर्तीवर "टी-20' क्रिकेट स्पर्धा 

"आयपीएल'च्या धर्तीवर "टी-20' क्रिकेट स्पर्धा 

जळगाव ः "आयपीएल'प्रमाणे शहरात "जळगाव टी-20 क्रिकेट लिग' स्पर्धा रंगणार आहेत. जळगावात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत आठ संघ मालकांची घोषणा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत केली. 
हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचे मुख्य प्रायोजकत्व स्वीकारलेले रतनलाल सी. बाफना यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत "जेसीएल टी-20'च्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच संघमालकांचा सत्कार करून त्यांच्या टीमच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सचिव अरविंद देशपांडे, संयुक्त सचिव अविनाश लाठी उपस्थित होते. 
जैन यांनी सांगितले, की छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानवर मॅट टाकून 12 ते 17 मार्च दरम्यान स्पर्धा रंगणार आहे. "जेसीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत आठ संघ मालकीचे असणार आहेत. या स्पर्धेसाठी 192 खेळाडूंनी नोंदणी केली आहे. स्पर्धेत आठ संघ असून, यामध्ये आठ आयकॉन खेळाडू सहभागी असतील. यामध्ये खेळाडूंचे गटवारी आयकॉन, ए, बी, सी अंडरनाइंटीन अशा पद्धतीने केली आहे. स्पर्धेत खेळले जाणारे सामाने, सहभागी संघ, सहभागी संघांचे मालक आहेत. स्पर्धेत रोज दिवस रात्र पद्धतीने तीन सामने होतील. 

असे आहेत संघ, संघमालक, "आयकॉन' 
जळगावात 12 ते 17 मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेत आठ संघ सहभागी आहेत. यामध्ये संघ क्रेझी कॉटेज स्टायकर्स (मालक प्रकाश चौबे, आयकॉन खेळाडू शशांक अत्तरदे), के. के. कॅन्स थंडर्स (आदर्श कोठारी, आयकॉन- प्रद्युम्न महाजन), खानदेश ब्लास्टर्सचे (ऋषभ जैन, आयकॉन- धवल हेमनानी), एम. के. वॉरियर्स (महेंद्र कोठारी, आयकॉन- तनेश जैन), रायसोनी ऍचिव्हर्स (प्रीतम रायसोनी, आयकॉन- खेळाडू सचिन चौधरी), सिव्हर ड्रॉप हेंल्दी मास्टर (धीरज अग्रवाल, आयकॉन- विजय लोहार), स्पेक्‍ट्रम चॅलेंजर्स (दीपक चौधरी, आयकॉन- जगदीश झोपे), वनीरा ईगल्स (किरण महाजन, आयकॉन- वरुण देशपांडे) असे संघ, संघमालक आणि आयकॉन खेळाडू आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com