जळगावकरांचा जाहीरनामा' शहर विकासाचा "रोडमॅप' : आमदार सुरेश भोळे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

जळगाव : शहरातील विविध घटकांतील नागरिकांशी चर्चा करून "सकाळ'ने तयार केलेला "जळगावकरांचा जाहीरनामा' हा शहर विकासाचा खऱ्या अर्थाने "रोडमॅप' ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करत भाजप आपल्या जाहीरनाम्यात त्यातील मुद्यांचा सामावेश करून पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार आहे, असे मत भाजपचे महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले. 

जळगाव : शहरातील विविध घटकांतील नागरिकांशी चर्चा करून "सकाळ'ने तयार केलेला "जळगावकरांचा जाहीरनामा' हा शहर विकासाचा खऱ्या अर्थाने "रोडमॅप' ठरेल, असा विश्‍वास व्यक्त करत भाजप आपल्या जाहीरनाम्यात त्यातील मुद्यांचा सामावेश करून पूर्ततेसाठी पाठपुरावा करणार आहे, असे मत भाजपचे महानगराध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी व्यक्त केले. 
"सकाळ'च्या गोलाणी व्यापारी संकुलातील शहर कार्यालयात निवासी संपादक विजय बुवा यांनी हा जाहीरनामा आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे यांच्याकडे सुपूर्द केला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापालिकेतील भाजपचे गटनेते सुनील माळी, महानगर सरचिटणीस महेश जोशी, युवक महानगराध्यक्ष जितेंद्र मराठे, संघटन सचिव विशाल त्रिपाठी, जिल्हा सरचिटणीस दीपक सूर्यवंशी, प्रसिद्धिप्रमुख मनोज भांडारकर उपस्थित होते. 
यावेळी आमदार भोळे म्हणाले, की महिला, युवक, व्यापारी, उद्योजक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, बांधकाम व्यावसायिक, वास्तुविशारद, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती यांच्याशी चर्चा करून त्यांना शहरातील विकासासाठी काय हवे आहे? याची सर्वंकष माहिती "जळगावकरांचा जाहीरनामा' यात घेण्यात आली आहे. त्यामुळे सर्व घटकांना जोडणारा हा जाहीरनामा आहे. 

पक्षांनाच नव्हे; उमेदवारांना उपयोगी 
"जळगावकरांचा जाहीरनामा' राजकीय पक्षांना उपयोगी तर ठरणारच आहे; परंतु खऱ्या अर्थाने उमेदवारांनाही कामाची दिशा दाखविणारा ठरणार आहे. भाजप या जाहीरनाम्यानुसार काम करण्यास बांधिल राहीलच; परंतु आमच्या जाहीरनाम्यात आम्ही या कामांचा उल्लेख करून जळगावकरांना आगामी काळात विकासाची हमी देणार आहोत. अर्थात, यात सत्तेचा प्रश्‍न गौण असणार आहे. "सबका साथ- सबका विकास' हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धोरणच आहे. त्यानुसारच आम्ही कार्य करणार आहोत. 

असा आहे भाजपचा "अजेंडा' 
* "हुडको'च्या कर्जापासून वर्षभरात मुक्ती. 
* चांगले उद्यान, शिक्षण सुविधा, रुग्णालय सुविधा उपलब्ध करून देणार. 
* उद्योगवाढीसाठी पूरक धोरण ठरविणार. 
* फेरीवाल्यांसाठी धोरण राबवून हक्काची जागा देणार. 
* केंद्र व राज्य सरकारच्या निधीतून जळगावचा विकास 
 

Web Title: marathi news jalgaon jahirnama suresh bhole