जलयुक्त'ची 401 कामे अपूर्णच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जुलै 2018

जळगावः जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात 2017-18 मध्ये 4 हजार 93 कामे प्रस्तावित होती. त्यापैकी 3 हजार 692 कामे पूर्ण झाली असून, पावसाळा सुरू होऊनही 401 कामे अपूर्ण आहेत. 

ही कामे केव्हा पूर्ण होतील आणि त्यात केव्हा पाणी साठले जाईल, याबाबत शंकाच उपस्थित केली जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. 

जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. जळगाव वनविभागाचे उपवनसंरक्षक दिगंबर पगार, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक संजय दहिवले, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, लघुसिंचनचे (जलसंधारण) कार्यकारी अभियंता राजेंद्र नंदनवार, लघुसिंचनचे (जिल्हा परिषद) कार्यकारी अभियंता श्री. नाईक, कृषी उपसंचालक अनिल भोकरे उपस्थित होते. 

श्री. निंबाळकर म्हणाले, की जिल्ह्यात जलयुक्तची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेर. ज्या भागात अद्याप पावसाचे प्रमाण कमी आहे, त्या भागातील प्रगतीत असलेली कामे वेळेत पूर्ण होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत. जी कामे पूर्ण झाली आहेत, त्यांचे जिओ टॅगिंग वेळेत करावे. बैठकीत 2016-17 मधील कामांचा आढावा घेण्यात आला; तर 2018-19 मध्ये करण्यात येणाऱ्या कामांच्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणांकडून जाणून घेतली. जिल्ह्यास 2 हजार शेततळ्यांचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. यापैकी जिल्ह्यात आतापर्यंत 1886 शेततळी पूर्ण झाली आहेत. उर्वरित शेततळ्यांची कामे लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केली. 

Web Title: marathi news jalgaon jalyukt shivar