जामनेर नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता; कॉंग्रेस- राष्ट्रवादी भुईसपाट! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

जामनेर ः राज्याचे जलसंपदा मंत्री असलेल्या गिरीश महाजन यांच्या जामनेरनगरपालिकेच्या निवडुकीत त्यांनी एकहाती सत्ता मिळविली. नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीला भुईसपाट करून सर्वच्या सर्व 25 जागांवर भाजपच्या उमेदवारांनी विजय प्राप्त केला. तर नगरराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या मंत्री महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार अंजली उत्तम पवार यांचा 8 हजार 353 मतांनी पराभव केला. 

जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया झाली होती. आज मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीपासून भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली होती. तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याने साधना महाजन यांनी पहिल्या फेरीतच 1400 मतांची आघाडी घेतली होती. ही आघाडी कायम राखत त्यांनी विजय प्राप्त केला. तर गतपंचवार्षिक निवडणुकीत जामनेर नगरपालिकेत 18 जागा मिळविणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीला या पंचवार्षिक निवडणुकीत खाते देखील उघडता आले नाही. जलसंपदा मंत्री यांनी जामनेर नगरपालिकेवर एकहाती सत्ता मिळवून जामनेरमधील आजपर्यंतचा इतिहास बदलविला आहे. निकाल घोषित झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांसह जलसंपदामंत्री महाजन यांनी जल्लोष केला. 
 
Web Title: marathi news jalgaon janmer nagarpalika bjp satta