जिल्हा बॅंकेतर्फे 225 पदांसाठी लवकरच भरतीप्रक्रिया 

जिल्हा बॅंकेतर्फे 225 पदांसाठी लवकरच भरतीप्रक्रिया 

जळगाव : गेल्या अनेक वर्षांपासून येथील जिल्हा बॅंकेत 500 विविध पदे रिक्त आहेत. आता लिपिकांच्या 225 पदांसाठी लवकरच भरतीप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. याबाबतची माहिती संचालक तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. 
जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक आज ऍड. रोहिणी खडसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विविध विषयांना मंजुरी देण्यात आली. याबाबतची माहिती संचालक खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी उपाध्यक्ष आमदार किशोर पाटील, संचालक चिमणराव पाटील, गुलाबराव देवकर, संजय सावकारे, ऍड. रवींद्र पाटील, अनिल भाईदास पाटील आदी उपस्थित होते. याबाबत श्री. खडसे यांनी सांगितले, की जिल्हा बॅंकेत विविध 500 पदांच्या जागा रिक्त आहेत. शासनाने त्या भरतीला मंजुरीही दिली आहे. मात्र, विविध कारणांमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. आता लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर, आचारसंहिता संपल्यानंतर लिपिकांच्या 225 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी "आयबीपीएस' या खासगी कंपनीला मक्ता देण्यात आला असून, ही कंपनीच ही संपूर्ण प्रक्रिया राबविणार आहे. ही सर्व ऑनलाइन प्रक्रिया असेल. या भरतीसाठी केवळ जळगाव जिल्ह्यातीलच भूमिपुत्रांना मंजुरी द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्याला मात्र मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे ही भरती खुली असेल. 
 
जिल्हा बॅंकेला 53 कोटी 75 लाखांचा नफा 
राज्यातील जिल्हा सहकारी बॅंकेची स्थिती अत्यंत खराब असताना जळगाव जिल्हा बॅंकेला मात्र यावर्षी तब्बल 53 कोटी 75 लाखांचा नफा झाला आहे, तसेच आर्थिक वर्षात बॅंकेच्या ठेवींमध्ये यावर्षी तब्बल 280 कोटींनी वाढ झाली आहे, तर 192 कोटींचे भागभांडवल आर्थिक वर्षात वाढले आहे. 
 
56 हजार शेतकऱ्यांना कर्जवाटप 
कर्जवाटपाबाबत श्री. खडसे यांनी सांगितले, की राज्य सहकारी बॅंकेकडून कोणतेही कर्ज न घेता जिल्हा बॅंकेतर्फे 56 हजार पात्र शेतकऱ्यांना 100 कोटींचे कर्जवाटप करण्यात आले आहे. बॅंकेचे सुमारे पाच लाख सभासद आहेत. डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे कर्ज वितरण करण्यात येत आहे. या कार्डवर अपघात विमाही लागू करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com