कामांच्या नियोजनासाठी "वर्क कॅलेंडर'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

जळगाव ः जिल्हा परिषदेंतर्गत सर्व विभागनिहाय विविध योजनांची विकास कामे राबविण्यात येत असतात. पण, वेळेवर नियोजन होत नसल्याने कामे लांबणीवर पडतात आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी कामे पूर्ण करण्यासाठीची एकच घाई होते. परंतु, विकास कामे योग्य वेळेत व्हावी आणि प्रत्येक लाभार्थ्यांला लाभ मिळावा, यासाठी "वर्क कॅलेंडर' तयार करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी दिवेकर यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. 

ग्रामविकासासाठी जिल्हा परिषदेच्या विभागांमार्फत विविध योजना राबविण्यात येतात. प्रामुख्याने बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा, समाजकल्याण, महिला व बालकल्याण, आरोग्य यासारख्या प्रमुख विभागांमधून योजना राबवून ग्रामीण भागातील लाभार्थ्यापर्यंत त्याचा लाभ दिला जातो. पण, अनेकदा नियोजन होत नसल्याने लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचत नसल्याने त्यांना विलंब होतो. तर, बांधकाम, लघुसिंचन व पाणीपुरवठा विभागाच्या योजनांची कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होईपर्यंत फेब्रुवारी- मार्च उजाडत असतो. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटी ही सर्व रस्सीखेच सुरू होते. हे प्रकार टाळणे आणि वेळेत कामे होण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांच्या संकल्पनेतून आर्थिक वर्षात कामांबाबतचे "वर्क कॅलेंडर' तयार करण्यात येणार आहे. 
 
वर्षाच्या शेवटी एकच घाई 
नवीन आर्थिक वर्ष लागण्यापूर्वीच विकास कामांवर करण्यात येणाऱ्या खर्चाचे बजेट सादर करण्यात आलेले असते. पदाधिकारी किंवा जिल्हा परिषद प्रशासनाकडून कामांचे नियोजन वेळेवर केले जात नसल्याचे योजना राबविण्यास उशीर होतो. म्हणजेच जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात कामांना प्रशासकीय मान्यता घेणे, तांत्रिक मान्यता, ई टेंडर प्रक्रिया राबविणे, कामांचे बिल मंजूर करणे यासारखी विविध कामांची धावपळ सोबतच सुरू होते. यात अनेक कामे प्रलंबित किंवा निधी खर्च करणे राहिल्याने निधी परत जाण्याची भीती असते. 

विभागांना देणार पत्र 
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागातून राबविल्या जाणाऱ्या योजनांमधील कोणत्या कामांना प्रथम प्राधान्य द्यायचे, याचे नियोजन करण्याबाबत सर्व विभागप्रमुखांना पत्र देण्यात येणार आहे. त्यातून वर्क कॅलेंडर तयार करणे सोपे होणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिवेकर यांनी सांगितले.

Web Title: marathi news jalgaon jilha parishad