जिल्हा परिषदेतील भाजपच्या सत्तेत फूट 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

जळगाव : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पदाधिकाऱ्यांत गेल्या काही महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. ती आता बाहेर पडू लागली असून उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात. त्यांनी तेथून जिल्हा परिषदेच्या कारभार करणे बंद करावे असा थेट आरोप केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत राजकीय खळबळ उडाली आहे. 

जळगाव : जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. पदाधिकाऱ्यांत गेल्या काही महिन्यापासून अंतर्गत धुसफूस सुरू होती. ती आता बाहेर पडू लागली असून उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर थेट शाब्दिक हल्ला चढविला आहे. त्या जळगावपेक्षा मुंबईतच अधिक वेळ असतात. त्यांनी तेथून जिल्हा परिषदेच्या कारभार करणे बंद करावे असा थेट आरोप केला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत राजकीय खळबळ उडाली आहे. 

जिल्हा परिषदेच्या आर्थिक विषयाच्या मंजुरीसाठी विशेष सभा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. मात्र ती सभा ऐनवेळी रद्द करण्याची नामुष्की सत्ताधाऱ्यावर आली. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांमध्ये नियोजन नसल्याचे दिसून येत असून त्यांच्यातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी सभा रद्द होण्याचे खापर थेट अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्यावर फोडले आहे. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की जिल्हा परिषदेचा निधी वेळेत खर्च व्हावा यासाठी गटनेते पोपट भोळे, सदस्य मधुकर काटे यांच्यासह गटनेत्यांनी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी अध्यक्षांना फोन केला, त्यांनी सभा घेण्यासाठी 23 तारीख ठरविली. तसेच सभेचे सचिव उपमुख्य कार्यकारी अधिकारी अकलाडे यांच्याशी बोलणे करून दिले व सभा ठरली मात्र नंतर अध्यक्षांनी ऐनवेळी सभा रद्द केली. त्यांनी हा निर्णय का घेतला याची आम्हाला माहिती नाही. 

मुंबई निवासानेच नियोजन बिघडते 
उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी अध्यक्षा उज्ज्वला पाटील यांच्या शाब्दिक हल्ला चढवीत त्या जळगावपेक्षा मुंबईलाच अधिक राहत असल्यामुळे कोणतेही नियोजन होत नाही. मुंबईतून राहून त्या जळगाव जिल्हा परिषदेचा कारभार पाहत असतील तर नियोजन नक्की बिघडणारच आहे. त्यामुळे त्यांनी अगोदर मुंबईतून जिल्हा परिषदेचा कारभार पाहणे बंद करावे असा टोलाही लगावला आहे. 

उपाध्यक्षांची अधिकाऱ्यांना क्‍लिनचिट 
उपाध्यक्ष नंदकुमार महाजन यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना क्‍लिनचिट दिली आहे. ते म्हणाले. सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी सभापती व गटनेत्यांनी नियोजन करून अध्यक्षांना कळविले त्यांनी देखील सहमती दर्शविली व अधिकाऱ्यांशी देखील ते स्वतः: बोलले मग सभा रद्द केली कुणी? अधिकाऱ्यांचा यात कुठला ही दोष नाही. अध्यक्षांनीच सभा रद्द केली आहे. त्यामुळे नियोजन लांबणीवर पडत आहे. 

मी मुंबईतून नव्हे, तर जळगावातूनच कारभार करते, महापालिका निवडणुकीत मी इथेच होते. केवळ वैयक्तिक कारणासाठी मुंबईला गेले होते. उपाध्यक्षांनी उगाच आरोप करू नये. 
-उज्ज्वला पाटील अध्यक्षा, जिल्हा परिषद जळगाव 
 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad