जिल्हा परिषदेतील भाजपच्या गटबाजीत जिल्हाध्यक्षांची मध्यस्थी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 डिसेंबर 2018

जळगाव ः जिल्हा परिषदेत कामांचे समान निधी वाटप करण्याच्या मुद्यावरून सत्ताधारी गटातील भाजपच्या सदस्यांनीच विरोध केला होता. त्यामुळे सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपवर ठराव नामंजूर होण्याची नामुष्की ओढवली होती. जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांच्या गटबाजीत भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी मध्यस्थी करत पडदा टाकण्याचे काम केले. त्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीत समान निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. 

जिल्हा परिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत समान निधी वाटपाच्या मुद्यावरुन सत्ताधारी गटास विरोधकांसह अनेक स्वकीयांचाही सर्वसाधारण सभेत विरोध पत्करावा लागला होता. या वादातून उफाळलेली गटबाजी मोडीत काढण्यासाठी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष उज्ज्वला पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी व सत्ताधारी गटातील सदस्य यांची आज (ता. 30) दुपारी अडीचला जि. प. अध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, प्रभाकर सोनवणे, रजनी चव्हाण, दिलीप पाटील आदींसह भाजपचे सदस्य उपस्थित होते. बैठकीत जयपाल बोदडे यांनी समान निधी वाटपाची भूमिका प्रभावीपणे मांडली. यास इतर अनेक सदस्यांनीही पाठिंबा दर्शविला. त्यामुळे अध्यक्ष व सभापती यांना देखील ही मागणी मान्य करावी लागली. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती व सत्ताधारी सदस्य या सर्वांना प्रत्येकी 30 लाख रुपये इतका निधी वाटप केला जाणार आहे. सत्ताधारी गटातील 33 व भाजपला समर्थन देणारे राष्ट्रवादीचे चार व कॉंग्रेसचे चार अशा चाळीस सदस्यांना प्रत्येकी 30 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 
 
जिल्हा परिषदेतील आमच्या सदस्यांची मते जाणून घेण्यासाठी बैठक घेतली. सर्वांच्या भावना जाणून घेतल्या. निधी वाटपावरून जे मतभेद असतील, काही तक्रारी असतील तर सदस्यांच्या मतांचा आदर करून अध्यक्ष, सभापतींनी योग्य तो निर्णय घ्यावा, असे त्यांना सांगितले आहे. 
- उदय वाघ, जिल्हाध्यक्ष, भाजप 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad bjp jilhadhksh wagh