निधी वाटप असेच राहील, सदस्यांना बोंबलू द्या!; जि.प. अध्यक्षांच्या वक्तव्यावरून गोंधळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

जळगाव ः निधीच्या समान वाटपाच्या मागणीवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच भागात कोट्यवधींचा निधी वाटून घेतल्याने या विषयास सर्व सदस्यांनी विरोध केल्यामुळे सभागृहात भाजप पदाधिकारीविरोधात भाजप सदस्य असे चित्र निर्माण झाले. त्यात भर म्हणजे अध्यक्षांनी "बोंबलू द्या त्यांना.. तुम्ही पुढील विषय घ्या' असे वक्तव्य केल्याने संतप्त महिला सदस्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत अध्यक्षांनी माफी मागावी, असा आग्रह धरला. 

जळगाव ः निधीच्या समान वाटपाच्या मागणीवरुन जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला. पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याच भागात कोट्यवधींचा निधी वाटून घेतल्याने या विषयास सर्व सदस्यांनी विरोध केल्यामुळे सभागृहात भाजप पदाधिकारीविरोधात भाजप सदस्य असे चित्र निर्माण झाले. त्यात भर म्हणजे अध्यक्षांनी "बोंबलू द्या त्यांना.. तुम्ही पुढील विषय घ्या' असे वक्तव्य केल्याने संतप्त महिला सदस्यांनी व्यासपीठाकडे धाव घेत अध्यक्षांनी माफी मागावी, असा आग्रह धरला. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज दुपारी सर्वसाधारण सभा झाली. अध्यक्षा उज्वला पाटील अध्यक्षस्थानी होत्या. महिला व बाल कल्याण सभापती रजनी चव्हाण, आरोग्य सभापती दिलीप पाटील, शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे, उपाध्यक्ष नंदू महाजन, समाज कल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, सीईओ शिवाजी दिवेकर, डेप्युटी सीईओ संजय मस्कर, बी.एस.अकलाडे व्यासपीठावर उपस्थित होते. 

सभा सुरू झाल्यानंतर विषय क्रमांक आठ, नऊ, दहा, बारा व चौदा यांना सत्ताधारी सदस्य जयपाल बोदडे, पल्लवी सावकारे, आदी 18 सदस्य, विरोधी सदस्य नाना महाजन, शशिकांत साळुंखे, प्रताप गुलाबराव पाटील, रवींद्र पाटील, पवन सोनवणे यासह एकूण 48 सदस्यांनी तीव्र विरोध केला. हे विषय नामंजूरच झाले पाहिजे यासाठी घोषणा दिली पाहिजे. गटनेते व शिक्षण सभापती भोळे, उपाध्यक्ष महाजन यांनी समान निधी वाटपाचा विषय मागील बैठकीत मंजूर आहे. अध्यक्षांना निधी वाटपाचे अधिकार देण्याचा निर्णय झाल्याने विषय नामंजूर करता येणार नाही. त्यावर नाना महाजन यांनी सांगितले की त्या बैठकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काही भाजपच्या सदस्यांचा विरोध असल्याचे पत्र सीईओंना दिले होते. ते पत्र विचारात न घेता हा विषय सर्वसाधारण सभेत ठेवलाच का ? अशी विचारणा करीत जाब विचारला. 

सदस्य झाले आक्रमक 
बोदडे व इतर सदस्यांनीही हे विषय नामंजूर करावेत अशी गळ घातला. विरोधी व सत्ताधारीही त्यात सहभागी झाल्याने अध्यक्षा, उपाध्यक्ष, शिक्षण सभापतींचा पारा चढला. त्यांनी येनकेन प्रकारे विषय मंजूर कराच अशी भूमिका घेतली. सदस्य बोदडे व महाजन हे नामंजुरीच्या अग्रभागी असल्याने त्यांना खास विनंती करण्यात आली. मात्र सर्वच सदस्यांच्या गटात समान विकास कामे होणार नसतील तर तो निधी कोणालाच नको अशी भूमिका घेतली. 
 
रात्री बसू.. नंतर बसू 
सत्ताधारीही विरोधकांच्या नामंजूर करण्यात सहभागी असल्याने सभापती भोळेंनी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना सांगितले तुम्ही मंजूर करा. हा पक्षाचा विषय आहे. "आपण रात्री बसू', "बैठकी नंतर बसू, वेगळी बैठक घेऊ त्यात निधी ठरवू' मात्र आता मंजूर करा, अशी विनंती केली. 

अध्यक्षांनी माफी मागावी 
अध्यक्षा म्हणाल्या, एकदा विषय मंजूर केला असताना त्याला आता नामंजूर करताहेत. समान निधी वाटपाचा अधिकार अध्यक्षांना आहे. त्यांना बोंबलू द्या. पुढील विषय घ्या. असे म्हणताच सदस्या पल्लवी सावकारेंसह इतर महिला सदस्यांनी अध्यक्षांनी केलेल्या विषयावर माफी मागावी अशी मागणी करीत अध्यक्षांच्या व्यासपीठाला घेराव घातला. 

नही चलेगी.. दादागिरी नही चलेगी 
सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी सर्वांवरच विषय मंजुरीसाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मंजुरीच्या कागदावर सह्या घेण्याचा प्रयत्न केला असता. असता विरोधी सदस्यांनी नही चलेंगी नही चलेंगी...दादागिरी नही चलेंगी..., बोदडे भाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है...नामंजूर नामंजूर...नामंजूर..असे सांगत बाकेही वाजविली. एका महिला सदस्यांनी सभागृह त्याग केला. 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad nidhi vatap sabha