आठशे विद्यार्थिनींना दाखविणार "पॅडमॅन' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

जळगाव ः अक्षयकुमारची प्रमुख भूमिका असलेला 'पॅडमॅन' चित्रपट मासिक पाळी आणि त्या काळात घ्यायची स्वच्छतेची काळजी या विषयावर चित्रित करण्यात आला आहे. अरुणाचलम येथील मुरुगन यांची सत्यकथा सांगणारा हा चित्रपट माध्यमिक शाळेतील किशोरवयीन मुलींना दाखविण्यात येणार आहे. शहरातील काही शाळांमधील आठशे विद्यार्थिनींना अस्मिता योजनेंतर्गत हा चित्रपट माध्यमिक शिक्षण विभागातर्फे दाखविला जाणार आहे. 

पॅडमॅन हा बहुचर्चित चित्रपट त्याच्या विषयामुळे गाजला. समाजातील काही संवेदनशील असलेल्या "मासिक पाळी' या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट किशोरवयीन मुलींना मोफत दाखवून मुलींमध्ये जनजागृती राबविण्याचा उद्देश आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या 1 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार अस्मिता योजनेंतर्गत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाच्यावतीने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळेतील आठवी ते दहावीच्या वर्गातील किशोरवयीन मुलींना "पॅडमॅन' हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. 
 
शुक्रवारी दाखविणार चित्रपट 
शासन निर्णयानुसार "पॅडमॅन' हा चित्रपट दाखविण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडून नियोजन करत जिल्हा परिषद व भवरलाल ऍण्ड कांताबाई जैन मल्टिपर्पज फाउंडेशन व अनुभूती स्कूल यांच्या विद्यमाने शहरातील निवडक दहा माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी 80 अशा एकूण 800 विद्यार्थींनींना  "पॅडमॅन' चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट शुक्रवारी (13 एप्रिल) सकाळी अकरा ते दोन या वेळेत कांताई हॉल (जुने नटराज थिएटर) येथे दाखविण्यात येणार आहे.

Web Title: marathi news jalgaon jilha parishad padman