जि.प. सदस्या पतीकडून सीईओंना शिवीगाळ 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या साळवा- बांभोरी बु. गटातील सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी सीईओंशी वाद घातला. दोघांमध्ये शाब्दीक वाद झाल्यानंतर अत्तरदे यांनी सीईओंना शिवीगाळ केल्याचा प्रकार आज दुपारी घडला. 

जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांचे पती चंद्रशेखर अत्तरदे यांनी जिल्हा परिषदेत येवून वाद घालण्याचा हा दुसरा प्रकार आहे. यापुर्वी त्यांनी बांधकाम विभागाचे तत्कालिन कार्यकारी अधिकारी कापडणीस यांना देखील शिवीगाळ केली होती. यानंतर पुन्हा आज त्यांनी सीईओंच्या दालनात येवून वाद घातला. अत्तरदे हे कामांचा ठेका घेत असून, भुसावळ नगरपालिकेत नगरसेवक देखील आहेत. आज काही कामानिमित्ताने ते मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या दालनात आले होते. यावेळी सीईओ डॉ. पाटील यांनी तुम्ही कोण म्हणून विचारले असता; याचा राग आल्याने अत्तरदे यांनी जोरदार वाद घालत सीईओंना शिवीगाळ केली. यामुळे जिल्हा परिषदेत सर्व कर्मचारी जमा झाले होते. शिवाय काही पदाधिकारी व अधिकारी यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon jilha parishad sadsya attarde ceo