जिल्ह्यात 1434 शाळाबाह्य मुले ! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 एप्रिल 2019

जळगाव ः शाळाबाह्य शोध मोहिमेत जिल्ह्यात 1 हजार 434 मुले शाळाबाह्य आढळून आली. त्यांना जून महिन्यात शाळेत दाखल करण्यात येणार असून दीड महिन्यांचे विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील यांनी दिली. पाचोरा तालुक्‍यात सर्वाधिक 330 शाळाबाह्य मुले आढळून आली आहे 

राज्य शासनाच्या सूचनेनुसार शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्राथमिक शिक्षण विभागाच्या माध्यमातून शिक्षकांच्या मदतीने शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येत असते. तसेच स्थलांतरित झालेल्या कुटुंबांतील बालकांचा शोध घेण्यात येतो. यंदा शाळेत प्रवेश घेतला पण कायम गैरहजर राहत असलेल्या शाळाबाह्य मुलांचा सुद्धा शोध घेण्यात आला. यामध्ये तब्बल 1 हजार 434 मुले शाळाबाह्य आढळून आली आहे. 

प्रवेश देवून प्रशिक्षण 
जिल्ह्यात आढळून आलेल्या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणात 1 हजार 434 मुले आढळून आले आहेत. या मुलांना जून महिन्यात शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर मुलांना प्रगत करण्यासाठी 15 जून ते 31 जुलै या दीड महिन्याच्या कालावधीत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

तालुकानिहाय शाळाबाह्य मुले 
अमळनेर- 73, भडगाव- 144, भुसावळ- 1, चाळीसगाव- 127, चोपडा- 141, धरणगाव- 1, एरंडोल- 65, जळगाव- 117, जामनेर- 236, मुक्ताईनगर- 48, पाचोरा- 330, पारोळा- 23, रावेर- 14, यावल 115. 

Web Title: marathi news jalgaon jilha parishad school other student