जिनिंग प्रेसिंग उद्योग संकटात 

जिनिंग प्रेसिंग उद्योग संकटात 

जळगाव ः खानदेशात कपाशीला नगदी पीक संबोधिले जाते. यामुळे खानदेशात कपाशीचे अधिक उत्पादन घेतले जाते. यंदा मात्र अत्यल्प पावसामुळे कपाशीचे उत्पन्न कमी आहे. जे उत्पादन झालेले आहे त्याला भविष्यात अधिक दर मिळेल या आशेने शेतकरी कापूस बाजारात आणीत नाही. कापूस जिनिंगकडे न आल्याने खानदेशातील जिनिंगमध्ये प्रक्रिया करण्यासाठी कापूस नाही. जो आहे त्याचे प्रमाण कमी आहे. यामुळे 130 पैकी 20 उद्योजकांनी आपल्या जिनिंग बंद ठेवल्या आहेत. केवळ वीस जिनिंग प्रेसिंग सुरू असल्याने जिनिंग प्रेसिंग उद्योग संकटात आला आहे. 

गतवर्षी कपाशीवर बोंडअळीने शेतकऱ्यांसह जिनिंग उद्योगावर संकट आले होते. यंदा अत्यल्प पावसामुळे कपाशीचे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना केवळ एकवेळ उत्पादन घेता आले आहे. दुबार, तिबार उत्पादन त्यांना शक्‍यच नाही. बागायतदार जमीनदारांकडे मात्र पाणी असल्याने त्यांचे दोन उत्पादन घेऊन झाले. जे उत्पादन झाले त्यापैकी काही कापूस शेतकऱ्यांनी विकला. मात्र त्यात दसऱ्या पूर्वी ओल होती. कपाशीला 4800 ते 5200 हजारापर्यंत भाव मिळाला. दसऱ्यानंतर मात्र कपाशीला ओल गेल्याने दर 5800 पर्यंत गेले. दसरा, दिवाळीमुळे शेतकऱ्यांनी सुरू असलेल्या दरात कापूस विकून सण साजरे केले. सणानंतर मात्र 
यंदा कपाशीचे अल्प उत्पन्न आहे. यामुळे बाजारात कपाशीला सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्याकडील कापूस साठवून ठेवला आहे. जिनिंगमध्ये प्रक्रिया करण्यासाठी कापूस पाहिजेच. तो नसला तर जिनिंग सुरू करून उपयोग नाही. उगाच विजेचे बिल, कर्मचाऱ्यांचे पगारावर खर्च होणार. यामुळे तब्बल एकशे तीस उद्योजकांनी उद्योगच सुरू केले नाहीत. जे सुरू आहे तेही जेमतेम उपलब्ध असलेल्या कापसावर. 
 
रोजची सहा कोटींची उलाढाल ठप्प 
खानदेशात आतापर्यंत केवळ दहा हजार गाठी तयार झालेल्या आहेत. कपाशी असती तर एक लाखावर गाठींचे उत्पादन आतापर्यंत झाले असते. खानदेशात दररोज तीनशे गाठी तयार होतात. त्यातून दररोज सहा कोटी साठ लाखांची उलाढाल होते. ती बंद होऊन केवळ पाच लाखांवर आली आहे. 

उद्योग बंदची ही आहेत कारणे... 
* शेतकऱ्यांनी कपाशीचा पुरवठा कमी 
* आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कपाशीला मागणी नाही 
* राज्यातही कपाशीच्या गाठींना अत्यल्प मागणी 
* सरकीचे भावही 2500 वरून 2100 पर्यंत घसरले 
* सूत गिरण्यांकडे सुताचा स्टॉक असल्याने मागणी नाही 
 
खानदेशात 90 टक्के जिनिंग कपाशीअभावी बंद आहेत. जे सुरू आहेत त्यात 10 ते 20 टक्केच उत्पादन होत आहे. कपाशीच्या गाठींना आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी नसल्याने कपाशीचे दर दोनशे रुपयांनी घसरले आहेत. शेतकऱ्यांनी अधिकाधिक कापूस विक्रीस आणला तर जिनिंग पूर्ववत सुरू होऊ शकतील. 
-प्रदीप जैन अध्यक्ष खानदेश जिनिंग प्रेसिंग मिल असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com