esakal | वारंवार कारवाईने कंटाळला...मग काय थेट ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटी केली ! 
sakal

बोलून बातमी शोधा

वारंवार कारवाईने कंटाळला...मग काय थेट ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटी केली ! 

अतिक्रमण विभाग नाहक त्रास देत आहे. त्यामुळे शेतात माल पडलेला असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे खडसे यांनी आरोप केले. 

वारंवार कारवाईने कंटाळला...मग काय थेट ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटी केली ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्हाधिकारी तसेच कृषी विभागाकडून शहरात फळ विक्रीचा परवनगी असतांना देखील 
महापालिकेच्या अतिक्रमण वारंवार कारवाई करण्यात आली. यावरून आज थेट उमाळा येथील खडसे फॉर्मच्या शेतकऱ्याने संतप्त होत महापालिकेच्या आवारात कलंगीडचे ट्रॅक्‍टरच उलटे करून तेथेच ठिय्या मारत महापालिकेच्या कारभारावर आरोप करत निषेध व्यक्त केला. 

क्‍लिक कराः अंत्यसंस्कारावेळी बसला आश्‍चर्यचा धक्का...दुसराच निघाला मृतदेह, धुळे रुग्णालयाचा गोंधळी कारभार ! 
 

जळगाव शहरात "लॉकडाऊनच्या' काळात रस्त्यावर तसेच मोकळ्या जागेवर भाजी व फळ विक्रेत्यांना महापालिकेने ठरावीक अंतरावर जागा उपलब्ध करून विक्रीसाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार रस्त्यावर देखील ठरावीक, अतिक्रमण न करता फळ, भाजी विक्रता करणाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आदेश देण्यात 
आले होते. परंतू अनेक फळ विक्रेत्यांकडून कोणता ही नियम न पाळता तसेच ग्राहकांची एकाच वेळी झालेली गर्दीमूळे अनेक कारवाई केल्या. अशीच कारवाई खडसे फॉर्मच्या कलिंगड विक्रेत्या ट्रॅक्‍टरवर आज कारवाई महात्मा गांधी उद्यान जवळ केली. दोन ट्रॅक्‍टर जप्त महापालिकेत अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने आणले. यावेळी शेतकरी अनिल खडके यांच्या अन्य साथिदार यांनी परवानगी असतांना का महापालिका कारवाई करत आहे असे आरोप केला. याबाबत अधिकाऱ्यांना भेटण्याच्या प्रयत्न केला. परंतू अधिकारी बैठकीत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरची ट्रॉली उलटीकरून सर्व कलिंगड महापालिकेच्या पार्किंगच्या जागेत टाकून देण्यात आले. 

नक्की वाचा : आमदारकीची संधी पक्षाने आता तरी द्यावी : एकनाथराव खडसे
 

शेतकऱ्यांनी आता आत्महत्या करण्याची वेळ 
ट्रॅक्‍टर उलटे करून अनिल खडके यांनी ठिय्या मांडून महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कारवाईचा निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालय, कृषी विभाग आम्हाला परवानगी देते. परंतू अतिक्रमण विभाग नाहक त्रास देत आहे. त्यामुळे शेतात माल पडलेला असून शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याचे खडसे यांनी आरोप केले. 

लोकांची गर्दी त्यामुळे कारवाई - खान 
कलिंगडच्या ट्रॅक्‍टवर लोकांची गर्दी मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानुसार ट्रॅक्‍टर नंतर सोडण्यात आले परंतू बैठकीत उपायुक्त असल्याने थोडा वेळ लागला. परंतू शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते व त्यांनी स्वःताहून एक ट्रॅक्‍टर त्यांनी नेऊन दुसरे ट्रॅक्‍टर त्यांनी मनपाच्या आवारात ओतून दिले अशी माहिती अतिक्रणम निर्मूलन विभागाचे अधिकक्षक एच. एम. खान यांनी दिली. 


क्‍लिक कराः तब्बल साडेतीन हजार नागरिक परराज्य, जिल्ह्यांतून जिल्ह्यात! 
 

loading image