महापौर, उपमहापौर पहाटेच आले...अन मग काय उडाली धापवळ 

jalgaon mayar chking by clinig sycitim imege
jalgaon mayar chking by clinig sycitim imege

जळगाव:महापालिकेने स्वच्छतेचा मत्ता दिलेल्या वॉटर ग्रेस कंपनीने संप पुकारल्याने शहरातील स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सोडविण्यासाठी मनपा महापौर भारती सोनवणे व उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे यांनी बुधवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास रस्त्यावर उतरुन शहरातील अनेक भागातील सफाई कर्मचाऱ्यांचे हजेरी दप्तरची तपासणी केली. यावेळी कामावर वेळेवर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची महापौरांनी चांगलीच कानउघडणी केली. 

वॉटरग्रेस कंपनीच्या सफाई तसेच घंटागाडीवरील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून शहरातील साफसफाईचे काम बंद केले आहे. मनपाकडून मक्तेदाराचे वेतन अदा होत नसल्याच्या कारणामुळे सफाई कर्मचाऱ्यांकडून काम बंद तर घंटागाड्यावरील चालकांनी कचरा संकलनाचे काम थांबवीले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन सध्या महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनच स्वच्छतेची कामे करुन घेण्यास सुरुवात केली आहे. याबाबत मंगळवारी प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याच्या सूचना देत धारेवर धरले होते. त्यानतंर आज महापौर भारती सोनवणे, उपमहापौर डॉ. आश्विन सोनवणे व स्थायी सभापती अड. शुचिता हाडा यांनी सकाळी रस्त्यावर उतरुन स्वच्छतेच्या कामांचा आढावा घेतला. तसेच युनिट व प्रभागात जावून कामगारांची हजेरी घेतली. 

अन्‌ कर्मचाऱ्यांध्ये धापवळ 
सकाळी सहा वाजता अचानक केलेल्या सप्राईज व्हिजिटमुळे मनपा सफाई कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. यावेळी गैहजर, नेहमी गैहजर तसेच रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नोंदी घेत आढावा घेण्यात आला. दरम्यान, कामाबाबत कोणी कसूर केल्याचे निदर्शनास आल्यास त्यावर मनपा प्रशासन कारवाई करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com