शिवसेनेकडून भाजप गटनेत्यांचा सत्कार...तो ही खुर्चीला हार घालून ! 

शिवसेनेकडून भाजप गटनेत्यांचा सत्कार...तो ही खुर्चीला हार घालून ! 

जळगाव ः महापालिकेतील भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी पत्रकार परिषदेत घरकूल प्रकरणात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसून या प्रकरणातून माजी मंत्री सुरेश जैन व माजी महापौर प्रदीप रायसोनी व आम्ही निर्दोष होवू असे म्हणाले होते. याबाबत शिवसेनेने सत्य बोलण्याचे धाडस बालाणी दाखविल्या बद्दल ते आज बालाणींचा सत्कार करणार होते. परंतू ते आज महापालिकेत आले नसल्याने शिवसेनेकडून भगत बालाणींच्या दालनातील खुर्चीला हार, पाचशे एक रुपये, नारळ, शाल वाहून सत्कार केला. 

जळगाव महापालिकेत भाजप- शिवसेनेच्या सदस्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून जोरदार आरोप प्रत्योराप सुरू आहे. त्यात सफाई मक्तेदारावरून देखील शिवसेनेच्या सदस्यांनी भाजपच्या नगरसेवकांवर केलेल्या आरोपाला उत्तर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी दिले होते. त्यामुळे जोरदार शिवसेना-भाजपच्या सदस्यांमध्ये शाब्दीक गेल्या काही दिवसापासून सुरू होता. त्यात भाजपच्या भगत बालाणी यांनी आपली तलवार म्यान करत माजी मंत्री जैन यांच्यासह आम्ही घरकुल घोटाळ्यातून निर्दोष सुटू असे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यानुसार नगरसेवक अनंत जोशी यांनी पत्रकार परिषदेत भगत बालानींचा सत्कार करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार आज दुपारी महापालिकेत आज भगत बालाणी त्यांच्या दालनात 
नसल्याने त्यांच्या खुर्चीला हार घालून, शाल, श्रीफळ व रोख पाचशे एक रुपये देवून जाहीर सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या दालनात यावेळी माजी पदाधिकाऱ्यांचे देखील नावाच्या पाट्या उलट्या ठेवल्याचे दिसून आल्याने याचा देखील शिवसेने यावेळी केला. याप्रसंगी शिवसेनेचे विरोधीपक्षनेते सुनील महाजन, गटनेते अनंत जोशी, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे आदी शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com