जळगाव शहराला जुलैपर्यंत पाणी पुरणार 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मे 2019

जळगाव ः यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे भूजल पातळीत घट झाली आहे. त्यामुळे धरणांची स्थिती चिंताजनक आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणावर केवळ 18 टक्के साठा उपलब्ध असल्याने पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता आहे. तरी जुलै महिन्यापर्यंत पाणी पुरणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अभियंता डी. एस. खडके यांनी दिली. 

वाघूर धरणातून शहराला पाणीपुरवठा केला जातो. नियोजित वेळापत्रकानुसार सध्यस्थितीला तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. धरणातील कमी असलेल्या पाणी साठ्यावरून तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पाणी बचतीचा तत्कालीन आयुक्तांना सूचना दिल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसावरून तीन दिवसाआड केला आहे. तरी वाघूर धरणात आता केवळ 18 टक्केच पाणीसाठा आहे. महापालिकेकडून जळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याला वर्षासाठी 40 दशलक्ष इतकी मागणी करण्यात येते. वाघूर धरणाची उच्चतम जलपातळी 234.10 मीटर आहे. महापालिका 220. 200 मीटर जलपातळीवरुन पाणी उचल कल्या जात आहे. तर डाऊनस्कीम 215 मीटर जलपातळीवर आहे. त्यामुळे पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्‍यता असल्याने "डाऊनस्कीम' योजना सुस्थितीत करून ठेवण्याबाबत उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून केली जात आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon july water supply down sceam waghur