कळमसरेला पाण्याचा वेढा 

live photo
live photo

कळमसरे (ता. अमळनेर) ः तालुक्‍यातील बहुतांश भागात आज सकाळपासून कोठे रिपरिप, मध्यम तर अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. परिणामी परिसरातील खेडी, वासरे नाल्याला महापूर आल्याने गावास पाण्याचा वेढा पडला. गावाशी संपर्क तुटला असून, प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. अमळनेर तालुक्‍यात आज मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली आहे. 

कळमसरे परिसरात सुमारे दीड तास, मारवड परिसरात सुमारे तीन तास पाऊस झाला. तसेच अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरूच होती. खेडी व वासरे नाल्याला मोठा पूर आल्याने न्यू प्लॉट भागात पाण्याचा वेढा पडला आहे. घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाडळसरे रस्त्यालगत असलेल्या भिल्ल व वडार वस्तीत घरांमध्ये पाणी शिरले होते. गावाच्या पश्‍चिमेस असलेला आदिवासी वस्तीत, नवीन घरकूल भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांची धांदल उडाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचे रात्रीच्या अंधारात ग्रामस्थांमध्ये भीती पसरली. वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता मनोज पवार यांना तत्काळ संपर्क साधल्याने त्यांनी पथकासह लागलीच वीजपुरवठा सुरळीत केला. पावसाने परिसरातील अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. घरात पाणी शिरल्याने खाद्य पदार्थ व संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान झाले आहे. पाऊस सायंकाळी उशिरा सुरू झाल्याने रात्री पावसाचा अंदाज येऊ शकला नाही. मात्र, गावात अचानक पाणी शिरल्याने सर्वत्र धावपळ सुरू होती. नाल्याला पाणी असल्याने रात्रीची बसही अडकून पडल्याने प्रवासी रात्री उशिरापर्यंत थांबलेले होते. 

तहसीलदारांनी घेतली धाव 
कळमसरे परिसराला पाण्याचा वेढा पडल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी सीमा अहिरे व तहसीलदार ज्योती देवरे यांनी आपत्ती व्यवस्थापन, पालिकेच्या अग्निशमदल पथक व बोटीसह कळमसरे येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दाखल झाल्या. ग्रामस्थांना सूचना देण्याचे काम प्रशासनाकडून सुरू करण्यात आले. पाडळसे रस्त्यावरील वस्तीत तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. या पथकास कळमसरे गावात शिरण्यास नाल्यातील पाण्याची अडचण निर्माण झाली. मात्र, प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले मदतकार्य सुरू केले आहे. कळमसरे येथील ग्रामस्थांनी पूरस्थितीतील अडकलेल्या ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी हलविण्यास मदत केली. बसमधील प्रवाशांच्या भोजनाचीही व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत पाणी ओसरण्याची शक्‍यता आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com