अन्‌ रस्तावर उभ्या मोटारसायकल अचानक घेतला पेट 

live photo
live photo

कजगाव (ता. भडगाव) : येथील बसस्थानक आवारातील मुख्य रस्तावर उभी असलेली मोटारसायकला अचानक आग लागली. दुचाकीने पेट घेतला मात्र सुदैवाने कोणतेही जिवीतहानी झाली नाही. परंतु अचानक घडलेल्या घटनेमुळे नागरीकांची एकच धावपळ उडाली. 
खाजोळा (ता. पाचोरा) येथे लग्नसोहळा निमित्ताने निलेश पाटील (रा. जळगाव) व विनायक पाटील हे प्लसर बजाज कंपनीच्या मोटारसायकलने (एमएच 18, ऐ के 4491) कजगाव येथे आले होते. दरम्यान एटीएम मशिनवर पैसे काढण्यासाठी गेले असता परत आले अन्‌ बसस्थानक आवारात रस्ताच्या बाजूला दुचाकी उभी केली. पैसे काढून परतल्यानंतर मोटारसायकल चालू करताच अचानक आग लागली. गाडीच्या टाकीतील पेट्रोलमुळे आगीचा भडका वाढला होता. चाळीसगाव- भडगाव या मुख्य रस्तावरच ही घटना घडल्याने गाडीला आग लागल्याने गाडीचा स्फोट होतो की काय? या भितीने प्रवाशी व नागरिकांची एकच धावपड उडाली. काही तरुणांनी नव्याने होत असलेल्या रस्तावरील बारदान व पाणी टाकत आग विझवली. मोटारसायकलला आग उष्णतेमुळे कि पेट्रोल गळतीमुळे लागली हे समजू शकले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com