केरळच्या पुराने नारळांची आवक बंद 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

जळगाव : गेल्या महिनाभरापासून सतत कोसळणारा पाऊस व महापूर यांमुळे केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भीषण आपत्तीमध्ये सर्व शेती नष्ट झाली असून, त्यामुळे केरळमधून होणारी विविध मालांची आयात बंद झाली आहे. प्रामुख्याने नारळाची आवक कमी झाल्याने ऐन सणासुदीत नागरिकांना भाववाढीचा फटका बसणार आहे. 

केरळमध्ये महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महाराष्ट्रात केरळमधून नारळासह अनेक वस्तूंची आयात केली जात असे. मात्र, या महापुरामुळे ही आयात पूर्णत: बंद झाली आहे. परिणामी रक्षाबंधनासह गणेशोत्सवाच्या काळात भाववाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी वर्तविली आहे. शहरात सणासुदीच्या काळात दररोज तीन हजारांहून अधिक नारळांची विक्री होत असते. त्यामुळे शहरात दररोज चार ते पाच ट्रक नारळाचे येत असतात. गणरायाच्या आगमनापासून त्याच्या विसर्जनापर्यंत नारळाचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याने मोदक, पूजा, नवस फेडणे, तोरण यांमध्ये वापरावे लागत असल्याने नारळांना मागणी अधिक असते. 

इतर राज्यांतून आयात 
केरळमधील आयात बंद असल्याने शहरातील व्यापाऱ्यांनी तमिळनाडू, कर्नाटकासह इतर राज्यांतूनही नारळ आयात केले आहेत. याचा नियमित नारळापेक्षा अधिक भाव आहे. येत्या दोन ते तीन दिवसांवर रक्षाबंधनाचा सण असून, या सणाला नारळाचे महत्त्व आहे. त्यामुळे नारळाची मागणी वाढली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून नारळाची आवक होत असली, तरी त्याचे दर नियमित नारळापेक्षा अधिक आहेत. 

शहरात केरळमधून नारळाची आवक होत असते. मात्र, आवक कमी झाल्याने आगामी काळात भाव वधारण्याची दाट शक्‍यता आहे. इतर राज्यांतील नारळाच्या किमतीदेखील अधिक आहेत. 
- प्रकाश चौधरी (विक्रेता) 

Web Title: marathi news jalgaon keral pur cocanut