खडकी बुद्रूकच्या सरपंच अपात्र; ग्रामसेवकही दोषी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

खडकी बुद्रूक (ता. चाळीसगाव) ः येथील ग्रामपंचायतीत झालेला भ्रष्टाचार व ‘एलईडी’ बल्ब खरेदी घोटाळाप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन नाशिकच्या विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत येथील सरपंच मिराबाई जाधव यांना अपात्र ठरवले असून त्यांच्यासह संबंधित ग्रामसेवकाकडून या प्रकरणी वसुलपात्र रक्कम पन्नास टक्क्यांप्रमाणे वसूल करावी, असे आदेश दिले आहेत.

याबाबत माहिती अशी, गावातील विलास चव्हाण यांनी ६ नोव्हेंबर २०१७ ला लोकशाही दिनी तक्रार अर्ज सादर केला होता. त्या अनुषंगाने १९ जानेवारी २०१८ ला ग्रामपंचायत सदस्य सुकदेव मांडोळे यांनी तशीच तक्रार गटविकास अधिकाऱ्यांकडे दिली होती. या तक्रारीनुसार, खडकी ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार तसेच बेकायदेशीररित्या भाडे पट्ट्याने दिलेल्या जागांमध्ये अपहार व ‘एलईडी’ बल्ब खरेदीत घोटाळा असे मुद्दे नमुद केले होते. त्यानुसार, पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, त्यात ‘एलईडी’ बल्ब खरेदीत २ लाख ३४ हजार ५२० रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबद्दल तथ्य आढळून आले होते. यात तत्कालीन ग्रामसेवक व्ही. आर.
चौधरी व ईश्‍वर भोई यांनाही जबाबदार धरण्यात आले होते. तसेच बेकायदेशीर भाडे पट्ट्यावर दिलेल्या जागांमध्येही प्रथमदर्शनी वीस हजारांचा अपहार केल्याचे आढळून आले होते. चौकशीचा हा अहवाल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठवला. त्यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठवल्यानंतर आयुक्तांनी सरपंच मिराबाई जाधव यांनी कर्तव्यात कसुर केल्याने त्यांच्यावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ३९ (१) अन्वये सध्याच्या कालावधीसाठी सरपंच व सदस्य या पदावर राहण्यास अपात्र ठरवले आहे. शिवाय सरपंच सौ. जाधव यांच्यासह संबंधित ग्रामसेवकांकडून या प्रकरणी वसुलपात्र रक्कम पन्नास टक्क्यांप्रमाणे वसूल करावी, असे आदेश दिले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon khadki budruk sarpanch inelagible