दमानियांच्या ट्‌वीटमुळे बदनामी झाल्याचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

जळगाव : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ट्विटरवर बदनामी केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी एप्रिल महिन्यात न्यायालयात खटला दाखल केला होता. जळगाव न्यायालयात दाखल या खटल्यात आज जबाब नोंदवण्यासाठी श्री. खडसे जिल्हा न्यायालयात आले होते. 

प्राप्त माहितीनुसार, अंजली दमानिया यांनी 13 एप्रिल रोजी ट्विटरवर खडसे यांनी न्यायालयांनी माझ्याविरुद्ध 22 खटले दाखल केले. खडसे रावेर न्यायालयाची दिशाभूल करून दबाव टाकत आहे. खडसे यांनी न्यायालयाला मॅनेज करून माझ्याविरुद्ध वॉरंट काढले असे म्हटले होते. दरम्यान, दमानिया यांनी बदनामी करून न्यायालयाचा अवमान करीत असल्याने खडसे यांनी न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. त्याप्रकरणी आज न्या. आर. डी. सिदनाळे यांच्या न्यायालयात त्यांच्या फिर्यादीची पडताळणी होऊन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. जबाबात त्यांनी रावेर न्यायालयात दाखल केलेला खटला हा कार्यकर्ते सुनील पाटील यांनी दाखल केला आहे. त्यामुळे माझा न्यायालयावर दबाव टाकण्याचा प्रश्‍न येत नाही. दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे माझी बदनामी झाली असून प्रतिष्ठा मलिन झाली. म्हणून बदनामीचा खटला दाखल केल्याचे आ. खडसे यांनी न्यायालयात सांगितले. आ. खडसे यांच्यावतीने ऍड. प्रकाश बी. पाटील यांनी कामकाज पाहिले. 

Web Title: marathi news jalgaon khadse damaniya