न्यायासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार :खडसे

न्यायासाठी आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाणार :खडसे

जळगाव : भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी तब्बल चाळीस वर्षे आपण काम केले. मात्र असा काय गुन्हा झाला कि पक्षाने आपल्यावर अन्याय केला?आपण चौकशीत निर्दोष झाल्यानंतरही भाजपचे राज्यातील सरकार छातीठोकपणे ते जाहिर का करीत नाही?आपण आपल्यावर झालेल्या या अन्यायाच्या विरोधात राज्यातील संपूर्ण जिल्हयात जावून जनतेच्या दरबारातच प्रश्‍न मांडून त्यांचे उत्तर शोधणार आहोत. वाढदिवसाच्या दिवशी हाच आपला संकल्प आहे. असे मत भाजपचे नेते व माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केले. 
एकनाथराव खडसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथे मंजूर करण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या तंत्रनिकेतनच्या इमारतीचे भूमीपूजन राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर एकनाथराव खडसे, "बेटीबचाओ बेटी पढाओ'चे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, आमदार संजय सावकारे, आमदार हरिभाऊ जावळे होते. यावेळी बोलतांना खडसे म्हणाले, कि आपण गेली चाळीस वर्षे पक्षाच्या विस्तारासाठी काम केले, पक्ष वाढविला.मात्र आज पक्ष सत्तेवर आल्यानंतर असे काय झाले?आज नाथाभाऊ एकदमच बदनाम झाले. याचे उत्तर आज पक्षाने देण्याची गरज आहे. आपल्यावरील सर्व आरोपांची चौकशी झाली आपण त्यातून निर्दोष सुटला परंतु सत्तेतील भाजप सरकार अद्यापही ते छातीठोकपणे का जाहिर करीत नाही?कि खडसे निर्दोष आहेत. माझा काय अपराध आहे, माझ्यावरच का अन्याय केला जात आहे?याचे उत्तर आपण आता शोधणार आहोत. आपण भाजप सोडणार असल्याचे सांगितले जाते,परंतु ते खोटे आहे. आपण कधीच भाजप सोडणार नाही, पक्षातच राहणार आहोत. मात्र आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जावून जनतेस आपण आपल्यावरी अन्यायाची दाद जनतेत मागणार आहोत. आजच्या वाढदिवसाच्या दिवशी हाच आपला संकल्प आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com