खडसेंचे भुसावळात आज होणार जंगी स्वागत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

जळगाव : भोसरी जमीन खरेदीप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)विभागाने माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना नुकतीच "क्‍लिन चीट' दिली आहे. त्याबाबतचा लेखी अहवाल न्यायालयात सादर केला आहे. यानंतर खडसे प्रथमच उद्या (11 मे) जळगाव जिल्ह्यात येत असल्याने कार्यकर्त्यातर्फे त्यांचे जंगी स्वागत होणार आहे. 

भोसरी जमीन खरेदी प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने न्यायालयात नुकताच अहवाल दिला असून त्यात खडसे व त्यांच्या कुटुंबियांनी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले असल्याचे सांगण्यात येत आहे. हा अहवाल सादर झाला तेंव्हा खडसे मुंबईतच होते. त्यांच्यावर गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यामुळे ते रूग्णालयातच होते. डॉक्‍टरांनी त्यांना आता "डिस्चार्ज' दिला आहे. ते उद्या (11 मे) जळगावात येत आहेत. 
दादर अमृतसर एक्‍स्प्रेसने सकाळी साडेसहाला ते भुसावळ येथे दाखल होणार आहेत. रेल्वेस्थानकावर आमदार संजय सावकारे व नगराध्यक्ष रमण भोळे त्यांचे स्वागत करतील. यावेळी भाजपचे सर्व नगरसेवक उपस्थित असतील. त्यानंतर ढोल ताश्‍यांच्या गजरात भुसावळमधील प्रमुख रस्त्यावरून त्यांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात शंभर चारचाकी वाहनांचा ताफा असणार आहे. प्रमुख रस्त्यावरून ही मिरणूक ताफ्यासह खडसे यांच्या मुक्ताईनगर गावी रवाना होईल. त्यावेळी रस्त्यातही 25 ठिकाणी त्यांचे औक्षण व स्वागत केले जाणार आहे. मुक्ताईनगरला पोहोचल्यानंतर खडसे मुक्ताईमंदिरात जाऊन मुक्ताईदेवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानतंर दोन दिवस ते मुक्ताईनगरातच मुक्काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: marathi news jalgaon khadse swagat