खानदेशातील ग्रामीण, आदिवासी खेळांच्या विकासावर "डाक्‍युमेंट्री'

खानदेशातील ग्रामीण, आदिवासी खेळांच्या विकासावर "डाक्‍युमेंट्री'

सावदा : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य नवीन शेट्टी सध्या खानदेश दौऱ्यावर असून, ते ग्रामीण व आदिवासी भागात जाऊन तेथील लोकजीवन व विविध खेळ, विशेषत: धनुर्विद्या खेळाचा विकास व अभ्यास करून या विषयावर "डाक्‍युमेंट्री' तयार करीत आहेत. शेट्टी यांनी आपल्या चमूसह आज डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलला भेट देऊन तेथील क्रीडांगणावर सुरू असलेल्या धनुर्विद्या खेळाच्या सरावाची पाहणी करून मुलाखती घेऊन चित्रफीत तयार केली. नंतर हा चमू पुढे सातपुड्याकडे वळला. 
प्राचार्या भारती महाजन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. शेट्टी म्हणाले, की आपल्या देशात खेळाच्या सुविधा नाहीत. परंतु ग्रामीण व आदिवासी भागातील मुले विविध खेळांमध्ये पुढे जाऊ शकतात. या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन व सुविधा मिळाल्या तर ते देशपातळी व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतही खेळू शकतात. एवढी क्षमता त्यांच्यात आहे. त्यासाठी या मुलांना खेळासाठी प्रोत्साहन व सुविधा देण्याची गरज आहे. क्रिकेटसाठी आम्ही काम करीत आहोतच; परंतु आता आम्ही आमचे लक्ष धनुर्विद्या खेळाकडेही वळविले आहे. ग्रामीण भागातील उत्तम धनुर्विद्या व विविध खेळ खेळणाऱ्या तीस शालेय खेळाडूंची निवड करून त्यांना मुंबईत सुविधा उपलब्ध करून देऊ. जेणेकरून ग्रामीण भागातील मुले-मुलीही देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळू शकतील. याबाबत राज्यपाल विद्यासागर राव यांची चारच दिवसांपूर्वी भेट घेतली व आमची खेळाबाबत सविस्तर चर्चा झाली. राज्यपाल महोदयांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. खानदेशातील नंदुरबार, जळगाव, शिरपूर आदी भागात जाऊन विविध खेळांचा अभ्यास करीत आहे. 
शेट्टी व निवेदिका टिया जोशी यांनी प्राचार्या महाजन, धनुर्विद्या प्रशिक्षक रायमल भिलाला, राष्ट्रीय खेळाडू जागृती तायडे, सृष्टी कोल्हे आदींची मुलाखत घेतली. यावेळी धनुर्विद्या, हॉकी आदी खेळांच्या सरावाचे चित्रीकरण केले. प्राचार्या महाजन म्हणाल्या, की आम्ही सर्व प्रकारचे खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो. आपला हा उपक्रम सुत्य आहे. धनुर्विद्या प्रशिक्षक भिलाला म्हणाले, की मी स्वत: सातपुड्यातील पालसारख्या आदिवासी भागातील असून, ग्रामीण भागातील मुले-मुली धनुर्विद्या खेळामध्ये पुढे जावे, यासाठी माझे प्रयत्न सुरू असून जागृती तायडे व सृष्टी कोल्हे या मुली धनुर्विद्या खेळाच्या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळल्या असून, सुवर्णपदक मिळविले. आता पुढील लक्ष्य आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. 
डाक्‍युमेंट्री फिल्म तयार करणाऱ्या चमूत दिग्दर्शक प्रशांत निघोजकर, निवेदिका टिया जोशी, क्रीडा ऍडव्हायझरी कमिटीचे व्यवस्थापक प्रदीप संपत आदींचा समावेश आहे. त्यांच्यासमवेत जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी एम. के. पाटील, अविनाश शिवरामे, विनोद माने, विनोद पाडळे, दिलीप तडवी आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com