नागपूरच्या भोयर दाम्पत्याने जिंकली "खानदेश रन'! 

राजेश सोनवणे
रविवार, 2 डिसेंबर 2018

जळगाव : जळगाव रनर ग्रुपतर्फे आयोजित "खानदेश रन' मॅरेथॉन आज स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात झाली. तीन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेतील 10 किलोमीटरचे अंतर पूर्ण करत नागपूरच्या भोयर दाम्पत्याने खानदेश रन स्पर्धा नावावर केली. यात पुरुष गटातून नागुराव भोयर आणि महिलांमधून शारदा भोयर यांनी सर्वात कमी वेळेत रन पुर्ण केली. 

जळगाव रनर ग्रुपतर्फे दुसरी "खानदेश रन' मॅरेथॉन स्पर्धा आज झाली. रनिंगचे कल्चर वाढत असून, त्याचा अनुभव आजच्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या "खानदेश रन'मधून पाहण्यास मिळाले. सागर पार्क मैदानावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच येथे स्पर्धेमुळे एक वेगळे वातावरण निर्माण झाले होते. खानदेश रन स्पर्धा 10, 5 आणि 3 किलोमीटर अशा तीन गटांत घेण्यात आली. यात 10 किलोमीटरची रन सकाळी सहाला सुरू झाली. गिर्यारोहक किशोर धनकुडे (पुणे) यांच्या प्रमुख उपस्थितीत रनला सुरवात झाली. यानंतर पवणेसातला 5 किलोमीटर आणि सव्वासातला तीन किलोमीटरची रन झाली. यावेळी आमदर सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, पोलिस अधिक्षक दत्ता शिंदे, विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम, तत्कालिन पोलिस अधिक्षक जालिंधर सुपेकर, सातपुडा ऑटोमोबाइल्सचे संचालक प्रा. डी. डी. बच्छाव, रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, डॉ. रवी हिराणी, निलेश भांडारकर आदी उपस्थित होते.

Web Title: marathi news jalgaon khandesh run marethon win bhoyer