खानदेश @ 45 

खानदेश @ 45 

जळगाव/नंदुरबार/धुळे ः खानदेशातील तापमानात गेल्या आठवडाभरात प्रचंड वाढ झाली आहे. आज जळगावात 45 अंशांपर्यंत तापमान नोंदविण्यात आले. तर नंदुरबार व धुळ्यातही 44 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दोन दिवसांपूर्वी खानदेशात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने ही लाट काही दिवस कायम राहण्याची शक्‍यता आहे. 
लोकसभा निवडणुकींतर्गत चौथ्या टप्प्यातील प्रचारतोफा थांबण्यास अवघा एक दिवस बाकी राहिल्याने धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत प्रमुख राजकीय पक्षांनी एकीकडे प्रचाराचे रान पेटविलेले असताना, दुसरीकडे सूर्यनारायणनानेही कोणतीच कसर ठेवलेली नाही. नंदुरबार जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यातील आतापर्यंतच्या सर्वाधिक 44 अंश तापमानाची नोंद शहादा येथे आज झाली. नंदुरबार शहरही कमालीचे तापले असून, येथील तापमानही 43.04 अंशांवर गेले. 
उष्णतेच्या लाटेत या वर्षात धुळ्यातील तापमानाने आज उच्चांक गाठला. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे धुळेकरांची काहिली होत आहे. अलीकडच्या काळातील सर्वाधिक म्हणजे 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार 24 एप्रिलपासून उष्णतेची लाट सुरू झाली. त्याचा परिणाम पहिल्याच दिवशी दिसून आला. तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक पोहोचले. बुधवारी (24 एप्रिल) 43 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेल्यानंतर तापमानवाढीचा हा जोर गुरुवारीही (25 एप्रिल) कायम राहिला. तापमानाचे सर्व उच्चांक गाठत धुळ्यात काल 43.04 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. हे या वर्षातील सर्वाधिक तापमान आहे. 
खानदेशात अंग भाजून काढणाऱ्या तापमानाने जनजीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले असून, गल्लीबोळ अन्‌ रस्तेही दुपारी चारपर्यंत ओस पडलेले दिसतात. खानदेशातील तापमान गेल्या आठवडाभरापासून 40 ते 42 च्या "रेंज'मध्ये राहिले. यंदाचा एप्रिल कमालीचा "हीट' ठरला आहे. 

ंनंदुरबार, धुळ्यात प्रचारही तापला 
तापमानवाढीबरोबरच लोकसभा निवडणुकीतील प्रचारासाठी नेते आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या आघाडीवर वेग घेतला आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला अवघा एकच दिवस उरल्याने प्रमुख राजकीय पक्षांनी एकीकडे प्रचाराचे रान पेटविले असताना, दुसरीकडे सूर्यनारायणनानेही कोणतीही कसर ठेवलेली नाही. सकाळी सातपासून सुरू झालेल्या प्रचाराबरोबरच तोही आग ओकत आहे. 
जे नेते सातत्याने "एअरकंडिशन'मध्ये राहतात, ते 44 अंश तापमानातही पायाला भिंगरी लावून फिरत आहेत. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यांत हे चित्र दिसत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com