अवैध गौण खनिज वाहतुकीचे वर्षभरात 33 गुन्हे 

अवैध गौण खनिज वाहतुकीचे वर्षभरात 33 गुन्हे 

जळगाव ः जिल्ह्यात अवैध वाळू उपसा बंद असल्यावरही चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक सुरूच आहे. जिल्हा गौण खनिज विभागातर्फे अवैध वाहतुकीला पायबंद होण्यासाठी विशेष मोहिमा आखल्या जातात. त्यात आजअखेर अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर 33 ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध वाहतुकीतून तीन कोटी 41 लाख 61 हजार रुपये दंड वसूल केला आहे. 
जळगावला तापी, गिरणा, वाघूर, तितूर या नद्यांमधून वाळूच्या गटांचे लिलाव केले जातात. ठरवून दिलेल्या वाळू ठेक्‍यातील ब्रासपेक्षा कित्येक पटींनी जादा वाळू उपसा केला जातो. त्यावर जिल्हा प्रशासनाने पायबंद घालण्यासाठी अनेकदा उपाययोजना केल्या. मात्र त्यावर कडी करीत रात्री-बेरात्री अवैध वाळू उपसा होतोच. 
तहसील कार्यालय, गौण खनिज विभाग, तलाठी, मंडलाधिकारी यांना ठरवून दिलेल्या वेळेत कारवाईचे आदेश दिलेले असतात. त्याद्वारे जिल्हा प्रशासनाला आतापर्यंत 549 अवैधरीत्या वाळू नेणाऱ्या 549 वाहनांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन कोटी 41 लाख 61 हजार रुपये दंड वसूल केला. 33 ठिकाणी वाळूमाफियांवर गुन्हे दाखल केले आहेत. 


तालुका--कारवाई केलेल्या अवैध 
वाहनांची संख्या--------दंडाची रक्कम--दाखल गुन्हे 
जळगाव--82--33 लाख 61 हजार--3 
जामनेर--13--7 लाख 98 हजार--0 
धरणगाव--95--41 लाख 59 हजार-1 
एरंडोल--31--20 लाख 53 हजार-2 
पारोळा--13--8 लाख 37 हजार--3 
भुसावळ--18--18 लाख 24 हजार--4 
बोदवड--1--1 लाख 9 हजार--0 
मुक्ताईनगर--27--30 लाख 45 हजार--0 
रावेर-- 49--31 लाख 42 हजार-2 
यावल--69--39 लाख 75 हजार--1 
अमळनेर--66--28 लाख 16 हजार--6 
चोपडा--20-- 9 लाख 13 हजार--4 
पाचोरा--33--38 लाख 65 हजार--0 
भडगाव--39--39 लाख 96 हजार--3 
चाळीसगाव--96--37 लाख 43 हजार--2 
एकूण--3 कोटी 41 लाख 61 हजार-33 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com