खरीप हंगामासाठी लागणार तीन लाख मेट्रिक टन खत 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

जळगाव : खरीप हंगाम तोंडावर असून कृषी विभागाने जिल्ह्यासाठी सुमारे 3 लाख मेट्रिक टन एवढी विविध खतांची मागणी केली आहे. दरम्यान, खानदेशातील मुख्य पीक असलेल्या कपाशी लागवडीसाठी अद्यापही नवीन बीटी बियाण्याची प्रतीक्षा कायम आहे. 

एप्रिल महिना सरत आला असून आता खरीप हंगामपूर्व कामांना सुरवात झाली आहे. या हंगामासाठी कृषी विभागाने शासनाकडे 3 लाख 40 हजार मेट्रिक टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. आता या मागणीची पूर्तता कधी होते, त्याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. 

बोंडअळीची धास्ती 
दुसरीकडे, शासनाने गेल्या वर्षापासून कापसाच्या राशी-659 या बियाण्यावर बंदी घातलेली आहे. या बियाण्यावर घातलेली बंदी कायम असून शासनाने यावर अद्यापदेखील निर्णय घेतलेला नसल्याची माहिती कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. अशातच गेल्या हंगामात बोंडअळीने शेतकऱ्याच्या हाती आलेला कपाशीच्या उत्पादनाचा घास हिरावून नेला होता, त्या धक्‍क्‍यातून शेतकरी अद्याप सावरलेला नाही. बोंडअळीबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले असले तरी त्याची धास्ती कायम आहे. 
 
2 मेस कृषी कार्यशाळा 
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व शेतकऱ्यांना शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचे माहिती व्हावी, यासाठी जिल्हा कृषी विभागातर्फे किसान कल्याण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त 2 मेस सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत शेतकऱ्यांना उत्पादकता वाढवून जास्त उत्पादन कसे घ्यावे, उत्पादन खर्च कमी करणे, खात्रीशीर उत्पन्न स्रोत, जोखीम व्यवस्थापन आणि शाश्वत पद्धती, कृषी संलग्न कार्यक्रम, कृषी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी विविध योजना, हरित मोहीम, पंतप्रधान किसान संपदा योजना या विषयांवर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्येक तालुक्‍यात स्तरावर विज्ञान केंद्रात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 

खतांच्या मागणीची आकडेवारी 
खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून विविध प्रकारच्या खतांची मागणी करण्यात आली आहे. त्यात 
युरिया : 1 लाख 34 हजार मेट्रिक टन 
डाय अमोनिअम फॉस्फेट : 20 हजार मेट्रिक टन 
एसएससी : 45 हजार मेट्रिक टन, 
म्यु ऑफ पोटॅश : 55 हजार मेट्रिक टन, 
एनपीके : 80 हजार टन 
एकूण : 3 लाख 40 हजार मे.टन 

Web Title: marathi news jalgaon kharip hangam