esakal | घरातच राहा, बाहेर पडू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोलून बातमी शोधा

घरातच राहा, बाहेर पडू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगावः राज्यात, देशात कोरोनोचे संकट आहे. शासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. नागरिकांनीही काही दिवस घरात बसावे, बाहेर पडू नका. कोरोना'बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. 
कोरोनो'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदी, कोरोनोचे रुग्ण, किराणा दुकानात होणारी गर्दी आदी विषयांवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

घरातच राहा, बाहेर पडू नका : पालकमंत्री गुलाबराव पाटील
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगावः राज्यात, देशात कोरोनोचे संकट आहे. शासन विविध पातळ्यांवर कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे. नागरिकांनीही काही दिवस घरात बसावे, बाहेर पडू नका. कोरोना'बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद द्या, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे केले. 
कोरोनो'च्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात सुरू असलेल्या संचारबंदी, कोरोनोचे रुग्ण, किराणा दुकानात होणारी गर्दी आदी विषयांवर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

पालकमंत्री म्हणाले, की किराणा घेण्यासाठी सर्वत्र गर्दी होते. जिल्ह्यात किराणा माल भरपूर आहे. आताच संपणारा नाही. उगाच गर्दी करू नये. "कोरोनो' वर उपाय तुर्ततरी नाही. मात्र कोरोना होऊ नये यासाठी नागरिकांनी घराबाहेर काही महिने घराबाहेर न पडणे हाच पर्याय आहे. तोच पाळणे योग्य ठरेल. 

जवळच्या रुग्णालयात सेवा 
जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे म्हणाले,की ग्रामीण भागात कोणी बाहेर गावाहून आला तर त्याला गावात येऊ देत नाही. किंवा कोणाला ताप, थंडी वाजली तर जिल्हा रुग्णालयातच येण्याचा आग्रह धरला जातो. नागरिकांनी असे करू नये. जिल्ह्यात सर्वत्र प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालये चोवीस तास उघडी ठेवण्यात आली आहेत. त्यात जाऊन उपचार करा. तेथील डॉक्‍टर ठरवतील रुग्णाला जळगाव पाठवायचे किंवा नाही. त्यासाठी तेच गाडी करून देतील. सर्व रुग्णालयात औषधसाठा भरपूर आहे, प्रशिक्षित स्टाफही आहे. 

जिल्ह्यात एकही कोरोना'चा रुग्ण नाही 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी सांगितले, की सुदैवाने एकही संशयित रुग्णाला कोरोनो झालेला आढळून आलेला नाही. जे आले होते ते संशयित होते. त्यावर उपचार करून ज्यांना डिस्चार्ज दिला आहे. कोरोना' पॉझिटिव्ह आला तर अडचण होऊ शकेल. जिल्हा रुग्णालयात अशा रुग्णांच्या उपचारासाठी व तपासणी साठी वेगवेगळे कक्ष करण्यात आले आहेत. त्यांना थेट व्हेटींलेटर ठेवावे लागते. कोरोनाचा संसर्ग अनेकांना झाला तर आपल्याकडे एवढे व्हेटींलेटर नाहीत. यामुळे कोरोनो होऊ न देण्यासाठी बाहेर न पडणे हाच पर्याय आहे. 

भाज्याची विक्री विविध ठिकाणी 
जळगाव शहरासह जिल्ह्यात भाजीपाला विक्रेत्यांना एकाच ठिकाणी बसू न देता लांब लांब ठिकाणी बसण्यास सांगितले आहे. शक्‍यतोवर भाजी विक्रेत्यांनी कॉलनी कॉलनीत जाऊन भाजी विकावी असे सांगितले आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांनी दिली.