कुंभारी बु. शिवारात दोन काळविटांचा मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 जुलै 2018

जळगाव ः तोंडापूर (ता. जामनेर) परिसरातील कुंभारी बु. शिवारात वेगवेगळ्या घटनेत दोन काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एकाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, तर दुसऱ्याचा मृत्यू कपाशी लागवडीसाठी शेतात अंथरलेल्या ठिबकच्या नळ्यात अडकून झाला. 

जळगाव ः तोंडापूर (ता. जामनेर) परिसरातील कुंभारी बु. शिवारात वेगवेगळ्या घटनेत दोन काळविटांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एकाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला, तर दुसऱ्याचा मृत्यू कपाशी लागवडीसाठी शेतात अंथरलेल्या ठिबकच्या नळ्यात अडकून झाला. 
तोंडापूरपासून जवळच असलेल्या कुंभारी बु. शिवारातील आत्माराम चपालाल पवार याच्या गट क्र 74 या शेतात कपाशीकरीता ठिबकच्या नळ्या अंथरलेल्या आहेत. या नळ्यांमध्ये दोन काळविट अडकले असल्याचे अवस्थेत सकाळी सहाच्या सुमारास फिरायला गेलेल्या अरुण पाटील व चरनदास बिऱ्हाडे यांना दिसली. त्यांनी लागलीच शेत मालक आत्माराम पवार यांना माहिती दिली. यानंतर त्यांच्यासोबत गावकऱ्यांनी शेतात जावून पाहिले असता काळविटांच्या दोन्ही शिंगात ठिंबकाच्या नळ्यामध्ये समोरासमोर गुंतागुंत स्थितीत अडकलेले होते. यात एकाचा मृत्यू झालेला होता. तर एक जिवंत होते मात्र ते सुटण्याचा प्रयत्न करत होते. जिवंत काळविटाला वाचविण्यासाठी मोहन पवार, संजय जोशी, सचिन सुरडकर, भिमराव बिऱ्हाडे, पंढरी कलाल, चंपालाल पवार, बापु पाटील यांनी अडकलेल्या नळ्या कापण्याचा निर्णय घेतला. काळविटाचे पाय पकडून शिंगात अडकलेल्या नळ्या विड्याच्या सहाय्याने कापून काळविटाची सुटका केली. सुटका होताच काळविटान पळ काढला. भेदरलेल्या स्थितीत पडत सुटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागल्याने काही अंतरावर नाल्यात सिमेंटच्या बांधातील खोल पाण्यात पडल्याने त्याचाही मृत्यु झाला. रात्रीच्यावेळी कपाशीच्या शेतात लढाई करताना दोन्ही काळवीटांच्या शिंगात समोरासमोर नळ्या अडकल्याने व त्या एकमेकांत गुंतागुंत झाल्याने एका काळविटाचा रात्रीच मृत्यु झाला होता. तर दुसरा सकाळपर्यंत सुटण्याचा प्रयत्न करत होता. यामुळे कपाशी पिकाचे व ठिंबकाचे मोठे नुकसान झाले. दुसऱ्याचा जिव वाचवण्यात गावाकऱ्यांना यश आले. मात्र पाण्यात बुडून काळविटाचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती वनविभागाचे कर्मचारी बळवंत पाटील यांना मिळताच त्यांनी समाधान धनवट, शब्बीर पिंजारी, श्रावण पाटील यांना घटनास्थळी येवून पंचनामा केला. दोन्ही काळविट चार व पाच वर्ष वयाची असून उत्तरिय तपासणी साठी गोद्री येथील कार्यालयात शासकीय वाहनातून नेण्यात आले. 

Web Title: marathi news jalgaon kumbhari 2 kadvit death