महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 12 मे 2018

महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार 

महापालिका निवडणूक "राष्ट्रवादी' स्वबळावर लढणार 

जळगाव : महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस "स्वबळावर' लढण्याच्या तयारीत असल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जळगावच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची मुंबई येथे भेट घेऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. 
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा बॅंकेचे संचालक संजय पवार, महापालिकेतील नगरसेविका अश्‍विनी देशमुख, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्‍वर महाजन, राष्ट्रवादी युवती शाखा जिल्हाप्रमुख कल्पिता पाटील आदींनी जयंत पाटील यांची भेट घेऊन प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी पाटील यांनी जिल्ह्यातील पक्षाबाबत माहिती जाणून घेतली. महापालिका निवडणुकीबाबतही त्यांनी चर्चा केली. जळगाव महापालिका निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस स्वबळावर लढणार आहे, याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकांच्या तयारीसाठी लवकरच जळगावचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी पदाधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले. 
 

Web Title: marathi news jalgaon ladhnar