पुतण्याच्या लग्नाला निघालेल्या काकाचा वाटेतच मृत्यु 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

जळगाव : विटनेर(ता.जळगाव) येथील नवरदेवचा आज जळगावी विवाह होता. कुटूंबीय नातेवाईकांचे वऱ्हाड पुढे काढून लग्नाला हजर राहण्यासाठी नवरदेवचे काका अण्णा हरी वराडे(वय-45) दापोरा येथून निघाले होते, शहरात दाखल होण्यापुर्वीच देवकर अभियांत्रीकी महाविद्यालया समोर वराडे यांना पोटशुल होवून त्रास जाणवल्याने ते अचानक चक्कर येवुन बेशुद्ध झाले. तत्काळ त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हारुग्णालयात हलवले. डॉक्‍टरांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषीत केले असून काकाच्या मृत्युची बातमी लग्नमंडपात कळताच वराडे कुटूंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली.

जळगाव : विटनेर(ता.जळगाव) येथील नवरदेवचा आज जळगावी विवाह होता. कुटूंबीय नातेवाईकांचे वऱ्हाड पुढे काढून लग्नाला हजर राहण्यासाठी नवरदेवचे काका अण्णा हरी वराडे(वय-45) दापोरा येथून निघाले होते, शहरात दाखल होण्यापुर्वीच देवकर अभियांत्रीकी महाविद्यालया समोर वराडे यांना पोटशुल होवून त्रास जाणवल्याने ते अचानक चक्कर येवुन बेशुद्ध झाले. तत्काळ त्यांच्या सोबतच्या नातेवाईकांनी त्यांना जिल्हारुग्णालयात हलवले. डॉक्‍टरांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषीत केले असून काकाच्या मृत्युची बातमी लग्नमंडपात कळताच वराडे कुटूंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. औद्योगीक वसाहत पोलिसांत अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

जळगाव शहरातील सागरपार्क मैदानावर आज मराठा उद्योजक मंडळ आणि अखिल भारतीय क्षत्रिय मराठा महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 1 रुपयात विवाह योजने अंतर्गत दखनी मराठा समुदायाच्या सामुहीक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालूक्‍यातीून आलेल्या 17 जोडप्यांचा येथे विवाहचे आयोजन करण्यात आले होते. दपोरा येथील रमेश हरी वराडे यांचा मुलगा सोपान याचेही आज लग्न होते. दपोरा येथून नातेवाईक कुटूंबीयांसह गावकऱ्यांचे वऱ्हाड सकाळीच जळगावी येण्यासाठी निघाले. काका म्हणुन वऱ्हाडींना काढण्याची जबबादारी पार पाडत अण्णा वराडेयांनी वऱ्हाडी मार्गस्थ केल्यावर जळगावी येण्यासाठी निघाले होते. जळगाव शहराच्या वेशीत प्रवेश करणार तत्पुर्वीच त्यांना पोटशुल जाणवु लागल्याने देवकर अभियांत्रीकी जवळ प्रचंडवेदना होवुन ते बेशुद्ध पडले. तशाच अवस्थेत त्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. जिल्हारुग्णालयात त्यांची सर्वांगीण तपासणी अंती डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृत्युचे वृत्त कळताच वराडे कुटूंबीयांनी जिल्हारुग्णालयात धाव घेतली. डॉ. विस्पुते यांनी पोलिसांत खबर कळवल्यावरुन पोलिस नाईक भरत लिंगायत यांनी रुग्णालयात येत मृतदेहाचा इक्वेस्टपंचनामा करुन पोलिस ठाण्यात अकस्मीक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. 

लग्न मंडपात मृत्युची बातमी 
सागरपार्क मैदानावर ऐन लग्न घटीका समीप येवून विवाह लागत असतांनाच अण्णा वराडे यांच्या कुटूंबीयांच्या कानी दु:खद वार्ता कळली, सुरवातील कुटूंबातील जेष्ठांनी रुग्णालयात धाव घेतल्यावर खात्री करुन इतरांना कळवले. लग्न लागल्यानंतर इतरांना अण्णाच्या मृत्युची बातमी समजल्यावर कुटूंबातील महिला नातेवाईकांनी एकच टाहो फोडत जिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

Web Title: marathi news jalgaon lagn death